मुंबई : तुम्ही जिओ फोनचा वापर करत असला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Reliance jio launch two plan) आहे. रिलायन्स जिओने आपल्या युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि 69 रुपये आहे. यापूर्वीही हा प्लॅन कंपनीने लाँच केला होता पण तो हटवून पुन्हा हा प्लॅन रिलाँच केला आहे. तसेच या प्लॅनच्या व्हॅलिडीटीमध्ये घट करण्यात आली (Reliance jio launch two plan) आहे.
जिओच्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ व्हॉईस कॉलिंग, तर इतर नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंगसाठी 250 मिनिट, 2 जीबी 4जी डेटा आणि 25 एसएमएस दिले जाणार आहेत. तसेच या प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांची आहे.
जिओच्या 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्स जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट, 25 एसएमएससह 7 जीबी डेटा दिला जाईल. या प्लॅनची व्हॅलिडीटीही 14 दिवसांची आहे. या दोन्ही प्लॅनचे रिचार्ज जिओच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
दरम्यान, जिओ फोनच्या ग्राहकांसाठी याव्यतीरिक्त 75, 125, 155 आणि 185 रुपयांचेही चार प्लॅन उपलब्ध आहेत. जिओच्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, इतर नेटवर्कसाठी 500 मिनिट, 50 एसएमएस, या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.