मुंबई : लवकरच IPL 2023 सुरू होणार आहे. मात्र, IPL सुरू होण्यापूर्वी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी नवीन नवीन JioFiber Backup Plan लॉन्च केला आहे. या नवीन बॅकअपची किंमत 198 रुपयांपासून सुरू होते. 30 मार्च 2023 पासून Jio ची ही नवीन सर्व्हीस यूजर्ससाठी उपलब्ध होईल. ही सर्व्हीस नक्की आहे काय आणि या सर्व्हीसचे तुम्हाला काय फायदे होतील, याबाबतची माहिती जाणून घ्या.
Reliance Jio च्या या नवीन सर्व्हीसची किंमत 198 रूपये (प्रति महिना) सुरू होते. 198 रूपये दिल्यानंतर तुम्हाला 10 Mbps स्पीडसह अमर्यादित डेटा मिळेल. तसंच तुमचं प्रायमरी ब्रॉडबँड कनेक्शन डाउन झाल्यास तुम्ही या सर्व्हीसचा लाभ घेऊ शकता. सोबतच तुम्ही एका क्लिकवर 1 दिवस, 2 दिवस किंवा 7 दिवसांसाठी 30Mbps किंवा 100Mbps पर्यंत स्पीड वाढवू शकता.
एवढंच नाही तर युजर्सना कंपनी सेट टॉप बॉक्स अपग्रेड करण्याचाही ऑप्शन देत आहे. प्रती महिना 100 रूपये भरल्यानंतर, तुम्हाला मोफत STB सह 400 लाइव्ह टीव्ही चॅनेलसोबत 6 OTT ॲप्सचा ॲक्सेस मिळेल.
तर दुसरीकडे, तुम्ही महिन्याला 200 रूपये भरल्यानंतर तुम्हाला मोफत सेट टॉप बॉक्ससह 550 लाइव्ह टीव्ही चॅनेलसोबत 14 OTT ॲप्सचा ॲक्सेस दिला जाईल.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बॅकअप प्लॅन किमान पाच महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल. तुम्हाला 5 महिन्यांसाठी 1490 रुपये खर्च येईल. म्हणजेच पाच महिन्यांसाठी 990 रुपये आणि इंस्टॉलेशनसाठी 500 रुपये खर्च येईल. तसंच बिलावर GST देखील जोडला जाईल.
जर तुम्हाला Jio चा हा नवीन बॅकअप प्लॅन घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला 6000860008 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल किंवा तुम्ही Jio च्या साइटवर किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या Jio रिटेलरकडे जाऊन बॅकअप कनेक्शन घेऊ शकता.