जिओ युझर्ससाठी रिलायन्स जिओ विविध रिचार्ज प्लॅन घेऊन येते. कंपनी जिओ ग्राहकांना कमी किंमतीत जास्तीत जास्त फायदा ऑफर करते. जिओच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि ओटीटी सब्सक्रिप्शनची ऑफर देण्यात आली आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी ॲमेझॉन प्राईम आणि जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन मोफत देण्यात येत आहे. कोणता आहे हा प्लॅन? कसा होईल ग्राहकांना फायदा, जाणून घ्या..
जिओचा 84 दिवस मुदतीचा प्लॅन
जिओचा 84 दिवस मुदतीचा प्लॅन ग्राहकांना केवळ 1,029 रुपये खर्च करून मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतील. यामध्ये ग्राहकांना एकूण 168 GB डाटा मिळेल. तर ग्राहक या प्लॅननुसार 2 GB पर्यंत हायस्पीड डाटा मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 एसएमएस मोफत देईल.मनोरंजनासाठी ॲमेझॉन प्राईम, जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.
72 दिवसांच्या मुदतीचा जिओ सिनेमा मोफत
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 72 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या अनलिमिटेड डाटामध्ये ग्राहकांना एकूण 164 GB डाटा ऑफर देण्यात येते. 2 GB हायस्पीड डाटासह +20GB वापरण्याची संधी या प्लॅनमध्ये देण्यात आली आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, रोजचे 100 एसएमएस मोफत मिळतील. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन पण देणार आहे.
601 रुपयांचा प्लॅन काय?
Jio चा 601 रुपयांचा प्लॅन खरेदीसाठी तुम्हाला 12 अपग्रेड व्हाऊचर मिळेल. ते तुम्ही एक-एक करुन रिडीम करू शकता. हे व्हाऊचर तुम्हाला माय जिओ ॲपवर दिसेल. व्हाऊचर रिडीम केल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड 5जी डेटाचा फायदा घेता येईल. एका व्हाऊचरची व्हॅलिडिटी केवळ 30 दिवसांची आहे. जर एखाद्या बेस प्लॅनमध्ये व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असेल तर व्हाऊचर सुद्धा 28 दिवसांसाठी सक्रिय राहील. त्यानंतर तुमचे दुसरे व्हाऊचर सक्रिय करता येईल.
मासिक 276 रुपयांमध्ये 365 दिवसांची मुदत
हा प्लॅन तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याच्या चिंतेपासून मुक्त करतो. या प्लॅनची मुदत एका वर्षाची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि ओटीटी सब्सक्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये एकूण 912.5 GB डेटा मिळतो. यामध्ये ग्राहकाला 2.5 GB हायस्पीड डाटा मिळतो. या प्लॅनमध्ये सिनेमाचे सब्सक्रिप्शन मिळते.