Jio चा धमाका, 299 रुपयांत 42GB डाटा; पुन्हा ही संधी कशी मिळणार?

| Updated on: Jan 02, 2025 | 11:52 AM

Reliance Jio Recharge Plan : जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर हा नवीन रिचार्ज प्लॅन तुम्हाच्या फायद्याचा आहे. युझर्सला अधिक फायद्यासाठी कंपनी 42जीबी डेटा ऑफर करत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ओटीटी सब्सक्रिप्शन पण मोफत देण्यात येणार आहे.

Jio चा धमाका, 299 रुपयांत 42GB डाटा; पुन्हा ही संधी कशी मिळणार?
रिलायन्स जिओची मोठी ऑफर
Follow us on

जिओने ग्राहकांसाठी धमाका ऑफर आणली आहे. या नवीन रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांचा मोठा फायदा होईल. यामध्ये जिओने ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फायदा देणारा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 42जीबी डाटा फ्री मिळेल. या प्लॅनमध्ये एकापेक्षा एक फायदे देण्यात आले आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि ओटीटी सब्सक्रिप्शन पण मोफत देण्यात येणार आहे.

जिओचा 299 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात. यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांची मुदत मिळते. त्यात ग्राहकांना 42 GB डाटा मिळतो. कंपनी या प्लॅननुसार, हायस्पीड 5G डेटा ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 एसएमएस फ्री देत आहे. याचा अर्थ नेट पॅकसह तुम्ही मित्रांशी एसएमएसद्वारे सुद्धा चॅटिंग करू शकता. याशिवाय रोज 1.5 GB डाटा वापरू शकता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ क्लाऊडचे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे. अर्थात यामध्ये जिओ सिनेमाचा साधा प्लॅन मिळतो. जर तुम्हाला प्रीमियम प्लॅन हवा असेल तर त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

हे सुद्धा वाचा

Jio Cinema मासिक, वार्षिक सब्सक्रिप्शन

Jio Cinema चा मासिक प्लॅन 299 रुपयांचा आहे. यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना संपूर्ण वर्ष जिओ सिनेमाचा आनंद लुटता येईल. तर मासिक प्लॅन हा केवळ 29 रुपयांचा आहे. जिओ सिनेमावरील प्रीमियम कंटेंट अवघ्या 29 रुपयांच्या मासिक खर्चात पाहायला मिळले. जिओ एकाहून एक कंटेंट स्ट्रीम करण्याची संधी देते. यामध्ये नवीन चित्रपटापासून ते टीव्ही कार्यक्रम, शो, विना जाहिरात दिसतील. त्यात आयपीएल पाहण्याचा आनंद लुटता येईल.

जिओचा 84 दिवसांचा खास प्लॅन

जिओचा 84 दिवसांचा खास प्लॅन मिळवण्यासाठी ग्राहकाला 1,029 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये अनेक फायदे मिळतील. यात ग्राहकाल एकूण 168 जीबी डेटा मिळेल. तर डेली हाय स्पीड 2 जीबी डेटा वापरता येईल. तसेच युजर्संना दररोज 100 एसएमएसही मिळतील. मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये ॲमेझॉन प्राइम लाइट, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.