दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने डेटा वापरात नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये या कंपनीने अगोदरच धाक जमवला आहे. तर आता रिलायन्सने चीनच्या कंपनीकडून पहिला क्रमांक पण हिसकावला आहे. डेटा ट्रॅफिकमध्ये चीनच्या कंपनीला मागे टाकत रिलायन्स जिओने पहिला क्रमांक पटकावला आहे. रिलायन्स जिओ डेटा ट्रॅफिकमध्ये क्रमांक एकची कंपनी ठरली आहे.रिलायन्स जिओचा गेल्या तिमाहीत एकूण डेटा ट्रॅफिक 40.9 एक्साबाईट इतका होता. त्यामुळे कंपनीने चीनच्या कंपनीला ही धोबीपछाड दिली.
एअरटेल यादीत कुठे?
तर जगात आतापर्यंत क्रमांक एकवर असलेली चीनची कंपनी घसरुन दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिची समान तिमाहीतील डेटा ट्रॅफिक 40 एक्साबाईटपेक्षा पण खाली आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर चीनची कंपनी आहे. तर भारताची एअरटेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. जगभरातील टेलिकॉम कंपन्यांचा डेटा ट्रॅफिक, ग्राहकांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवणारी टीएफिशिएंटने हा अहवाल सादर केला आहे.
डेटा वापर वाढला
5जी सेवा सुरु झाल्यानंतर रिलायन्स जिओचा डेटा वापर वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत डेटा वापरात 35.2 टक्के उसळी दिसून आली आहे. जिओचे ट्रू 5जी नेटवर्क आणि जिओ एअर फायबरचा विस्तार यामुळे डेटा वापर वाढल्याचे समोर आले आहे. रिलायन्स जिओच्या तिमाही निकालानुसार, जिओ ट्रू 5जी नेटवर्कवर 10 कोटी 80 लाख ग्राहक जोडल्या गेले आहेत. जिओच्या एकूण डेटा ट्रॅफिकमधील जवळपास 28 टक्के हिस्सा आता 5जी नेटवर्कमधून येत आहे. तर दुसरीकडे जिओ एअर फायबरने देशातील 5,900 शहरांमध्ये सेवा सुरु केली आहे.
यापूर्वी किती डेटा वापर
ग्राहकांचा गेल्या काही वर्षांतील डेटा वापर वाढला आहे. ग्राहकांनी डेटा वापराची कमाल मर्यादा ओलांडली आहे. आता डेटा वापर वाढला आहे. जिओ नेटवर्कवर प्रति ग्राहक मासिक डेटा वापर वाढून 28.7 जीबी वाढला आहे. तीन वर्षांपूर्वी हा आकडा केवळ 13.3 जीबी होता. कोरोना काळापूर्वी 2018 मध्ये भारतात एका तिमाहीत एकूण मोबाईल डेटा ट्रॅफिक मात्र 4.5 एक्साबाईट होता.