नवी दिल्ली | 16 February 2024 : जर तुम्ही देशातील मोठ्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर, ॲमेझॉनसह फ्लिपकार्टवरुन सामान, वस्तू खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या Replacement Policy मोठा बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेली एकादी वस्तू खराब जर झाली तर तुम्हाला आता ती लागलीच बदलवून मिळणार नाही. तुमच्या डोक्याला विकतचा ताप होणार आहे. वस्तू विकत घेऊन ती बदलण्यासाठी मनस्ताप होईल, काय झाला आहे बदल? जाणून घ्या..
ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने केला मोठा बदल
आता वस्तू बदल अवघड
जर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरुन एखादी डिजिटल वस्तू, उत्पादन खरेदी केल्यास, त्यात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इयरबड्स खरेदी केल्यास, तुमच्या जवळचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे, त्याची माहिती घेऊन ठेवा. जर हे उत्पादन खराब निघाले तर तुम्हाला तात्काळ सेवा केंद्रावर जाऊन त्यासंबंधीची तक्रार करता येईल आणि हे उत्पादन कधी मिळणार याची माहिती घेता येईल. पण या धोरणामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार हे नक्की.