मुंबई : अॅपलने दोन महिन्यांपूर्वी iPhone 12 सीरिजमधील स्मार्टफोन लाँच केले होते. जगभरात या सीरिजमधील स्मार्टफोन्सना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. तसेच सेलच्या (विक्री) बाबतीत आयफोन 12 ने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. iPhone 12 जगातील बेस्ट सेलिंग स्मार्टफोन म्हणजेच सर्वाधिक विक्री झालेला 5 जी स्मार्टफोन ठरला आहे. या स्मार्टफोनची विक्री अजून वाढावी यासाठी कंपनीने आता शानदार ऑफर सादर केली आहे. (Republic Day sale: Get Apple’s iPhone 12 series with starting price of Rs 48,900)
कंपनीने सादर कलेल्या नव्या ऑफरद्वारे तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त iPhone 12 सिरीजमधील स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत खरेदी करु शकता. या सेलमध्ये तुम्ही iPhone 12 केवळ 61,900 रुपयांमध्ये तर iPhone 12 Mini केवळ 48,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. iPhone 12 आणि iPhone 12 Mini च्या किंमतीमध्ये बँक ऑफर, कॅशबॅक ऑफर आणि जुना फोन एक्सचेंज करत असाल तर त्यावरही जबरदस्त डिस्काऊंट ऑफरचा समावेश करण्यात आला आहे. ही नवी ऑफर IndiaIStore वेबसाईटवर लिस्ट करण्यात आली आहे. ही वेबसाईट अॅपलची अधिकृत रिटेलर आहे.
HDFC बँकेच्या कार्डवर कॅशबॅक
HDFC बँकेच्या ग्राहकांना शानदार कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास तुम्हाला आयफोन 12 वर 6000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास तुम्हाला 6000 रुपयांचा तर डेबिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास 1500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. सोबतच HDFC Bank, Zest, बजाज फिनसर्व आणि IDFC फर्स्ट बँकेद्वारे नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेता येईल.
एक्सचेंज ऑफरवर मोठा डिस्काऊंट
iPhone 12 सिरीजमधील स्मार्टफोन्स जर तुम्ही एक्सचेंज ऑफरवर खरेदी केले तर तुम्हाला 3000 रुपयांपर्यंतचा एक्स्ट्रा एक्सचेंज कॅशबॅक मिळेल. iPhone 11, iPhone XR आणि iPhone SE वरही खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या फोन्सवर 9 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात आला आहे.
डिस्काउंटनंतर किती रुपयांमध्ये आयफोन खरेदी करता येईल?
iPhone 12 mini (64GB) – 48900.00 रुपये
iPhone 12 Pro Max (128GB) – 112900.00 रुपये
iPhone 12 Pro (128GB) – 102900.00 रुपये
iPhone 12 (64GB) – 61900.00 रुपये
iPhone SE (64GB) – 20900.00 रुपये
iPhone 11 (64GB) – 42900.00 रुपये
iPhone XR (64GB) – 28900.00 रुपये
आयफोन 12 चे फिचर्स
Apple ने आयफोन 12 पाच नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये निळा, लाल, काळा, पांढरा आणि हिरवा या रंगांचा समावेश आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे.
आयफोन 12 सिरेमिक शील्डने सुसज्ज आहे ज्यामुळे हा फोन पूर्वीपेक्षा टिकाऊ बनला आहे. आयफोन 12 हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा + 12 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह लाँच करण्यात आला आहे.
आयफोन 12 मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर आयफोन 12 प्रो मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोन 12 मध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. जो वाइड आणि अल्ट्रा वाइड लेन्सने सुसज्ज आहे.
आयफोन 12 प्रो मध्ये 12 मेगापिक्सलचा F1.6 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरादेखील देण्यात आला आहे. सोबत 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!
जुना अँड्रॉइड फोन द्या अन् नवा आयफोन घ्या, ‘iPhone 12’वर तब्बल 22 हजारांचा घसघशीत ‘डिस्काउंट’!
(Republic Day sale: Get Apple’s iPhone 12 series with starting price of Rs 48,900)