मुंबई : हल्ली फिटनेस बँडची क्रेझ वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तरुण पिढीच्या मनगटावर घड्याळाऐवजी फिटनेस बँड दिसू लागेल आहे. लवकर Xiaomi या कंपनीद्वारे नवीन फिटनेस बँड बाजारात आणलं जाणार आहे. मात्र त्याआधीच या बँडचे फोटो आणि फिचर सोशल मीडियाद्वारे लीक झाले आहे. Xiaomi च्या नवीन फिटनेस बँडचे Mi Band 4 असे नाव आहे.
चीनच्या Weibo या वेबसाईटने याबाबतचे काही फोटो व फिचर दिले आहेत. यानुसार Mi Band 4 मध्ये कलर डिस्प्ले देण्यात येणार आहे. Mi Band 2 किंवा 3 प्रमाणे या बँडला कोणतेही बटण असणार नाही. त्यामुळे हा बँड पूर्णत: टच स्क्रीन असणार आहे. त्यासोबतच या फिटनेस बँडची बॅटरी जास्त काळापर्यंत टिकणार आहे.
Mi Band 3 मध्ये 110 mAh बॅटरी देण्यात येत होती. त्या तुलनेत Mi Band 4 मध्ये बॅटरी वाढवून 135mAh देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या फिटनेस बँडमध्ये Bluetooth 5.0 ब्ल्यूथ कनेक्टीव्हीटी दिल जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या बँडची चार्जरही बदलण्यात आले असून, आता युजर्स या बँडला डायरेक्ट चार्ज करु शकणार आहेत. विशेष म्हणजे या बँडमध्ये photoplethysmography म्हणजे PPG सेन्सर बसवण्यात आलं आहे. त्यामुळे या बँडद्वारे युजर्सला ब्लड प्रेशरही चेक करता येणार आहे.
Mi Band 4 हे दोन वर्जन मध्ये लॉच करण्यात येणार आहे. यातील एका बँडची किंमत 5 हजार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या वर्जनमध्ये लाँच होणाऱ्या बँडची किंमत 2 किंवा 3 हजार असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आतापर्यंत Xiaomi कंपनीद्वारे तीन फिटनेस बँड लाँच करण्यात आले आहे. त्यानंतर आता चौथा फिटनेस बँड कंपनीद्वारे लवकर लाँच केला जाणार आहे. अद्याप कंपनीद्वारे मात्र या फिटनेस बँडची किंमत आणि फिचर्स रिलीज करण्यात आलेले नाहीत