नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आता मोबाईल नेटवर्क ग्राहकांच्या बाजारपेठेतील विशिष्ट वर्गावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. देशातील 30 कोटी नागरिक अजूनही 2जी नेटवर्कचा वापर करतात. या लोकांना स्मार्टफोनच्या वापरासाठी उद्युक्त करण्यासाठी एका विशेष धोरणाची गरज असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. (RIL chairman Mukesh Ambani at India Mobile Congress)
मुकेश अंबानी मंगळवारी दिल्लीत दूरसंचार क्षेत्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी देशात डिजिटल ट्रॉन्सर्फोमेशनची गरज बोलून दाखविली. सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वोत्तम डिजिटल कनेक्टेड देशांपैकी एक आहे. तरीही आपल्या देशातील 30 कोटी लोक अजूनही 2जी नेटवर्कवरच अडकून पडले आहेत. त्यामुळे आपल्याला असे धोरण आखायला पाहिजे की, हे लोकही डिजिटल ट्रांझेक्शनसाठी सक्षम होतील, असे अंबानी यांनी सांगितले.
यावेळी मुकेश अंबानी यांनी भारतातील 5जी सेवेच्या प्रवेशासंदर्भातही भाष्य केले. भारतात 5जी नेटवर्क लवकरात लवकर आले पाहिजे. आमची जिओ कंपनी देशभरात ही डिजिटल क्रांती आणण्यासाठी सक्षम आहे. त्यासाठी आम्ही सध्या मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ सेमीकंडक्टर्स विकसित करत आहोत. आमचा खूप जास्त आयातीवर विश्वास नाही, असे अंबानी यांनी म्हटले.
It is due to your innovation & efforts that the world was functional despite the pandemic. It is due to your efforts that a son connected with his mother in a different city, a student learnt from his teacher without being in the classroom: PM Modi at India Mobile Congress pic.twitter.com/QHxSsrx4WN
— ANI (@ANI) December 8, 2020
भारतात 5जी नेटवर्क उपलब्ध झाल्यास आत्मनिर्भर भारत एकत्र जोडला जाईल आणि देश चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी सज्ज होईल, असेही अंबानी यांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओने आपण स्वत:ची अशी 5जी यंत्रणा विकसित केल्याचा दावा केला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इंडिया मोबाईल काँग्रेस या सोहळ्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज या सोहळ्यात मार्गदर्शन केले. 5 जी नेटवर्कच्या रुपाने भविष्यात उडी मारण्यासाठी आणि कोट्यवधी भारतीयांना सक्षम करण्यासाठी आपल्याला एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे.
तंत्रज्ञानातील सततच्या बदलांमुळे आपल्याकडे सतत मोबाई फोन आणि इतर उपकरणे बदलली जातात. अशावेळी ई-कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी या क्षेत्रातील लोकांना घेऊन टास्क फोर्स निर्माण करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला.
संबंधित बातम्या:
स्मार्टफोनच्या दुनियेतील ‘ही’ अग्रेसर कंपनी आता भारतात लाँच करणार टीव्ही आणि साऊंडबार
नवीन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरसह Realme, Oppo आणि Xiaomi चे स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर
256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर
(RIL chairman Mukesh Ambani at India Mobile Congress)