सॅमसंग लवकरच लाँच करणार ५० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या संपूर्ण तपशील

| Updated on: Nov 16, 2024 | 7:03 PM

सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A36 लाँच करण्याच्या तयारीत आहे. गॅलेक्सी A35 चे अपग्रेड म्हणून नवा स्मार्टफोन बाजारात लाँच केला जाणार आहे.

सॅमसंग लवकरच लाँच करणार ५० मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन, जाणून घ्या संपूर्ण तपशील
Follow us on

सॅमसंग कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी व चाहत्यांसाठी नवीन फोन लवकरच लाँच करणार आहे. सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A36 लाँच करण्याच्या तयारीत आहे. गॅलेक्सी A35 चे अपग्रेड म्हणून नवा स्मार्टफोन बाजारात लाँच केला जाणार आहे. सॅमसंगने मात्र या नव्या गॅलेक्सी ए-सीरिज डिव्हाइसच्या लाँचिंगच्या तारीख अद्याप उघड  केलेली नाही. तसेच सॅमसंग गॅलेक्सी A35 या मागील मॉडेलच्या तुलनेत हा अपग्रेडेड सेल्फी कॅमेऱ्यासह येणार असल्याचे एका लीकमधून समोर आले आहे. या फोनच्या मागील बाजूस गॅलेक्सी A36 मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी A36 हा स्मार्टफोन मार्च २०२५ मध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेटसह लाँच होण्याची शक्यता आहे. चला तर मग पाहूयात आतापर्यंत समोर आलेल्या डिटेल्सवर…

Samsung Galaxy A36 मध्ये मिळणार नवा सेल्फी कॅमेरा

गॅलेक्सी क्लब (डच) च्या रिपोर्टनुसार, गॅलेक्सी A36 मध्ये फ्रंट कॅमेऱ्यात १२ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आलाअसून फ्रंट कॅमेऱ्याचा सेन्सर हा गॅलेक्सी ए५६ च्या १२ मेगापिक्सेल सेन्सरसारखा नसेल. असे म्हटले जात आहे की सॅमसंग आगामी गॅलेक्सी ए36 आणि गॅलेक्सी ए56 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कॅमेरा गुणवत्तेत थोडा फरक असण्याची शक्यता आहे.

फोनमध्ये मिळणार ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी A36 मध्ये सध्याच्या गॅलेक्सी A35 प्रमाणेच ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळेल, असे अहवालात म्हटले गेले आहे. मागील मॉडेलप्रमाणेच कॅमेरा सेटअपमध्ये ५ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा असू शकतो.

हे सुद्धा वाचा

नुकत्याच झालेल्या गीकबेंच लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोनबद्दल असे सांगण्यात आले कि, गॅलेक्सी A36 हा फोन स्नॅपड्रॅगन ६ जेन ३ चिपसेट किंवा स्नॅपड्रॅगन ७एस जेन २ चिपसेटसह कॉन्फिगरेशनमध्ये ६ जीबी रॅमसह सुसज्ज असणार आहे. हा नवा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ वर काम करणार आहे.

पुढच्या वर्षी मार्चमध्ये पदार्पण

गॅलेक्सी A36 च्या रेंडर्सवरून असे दिसून आले आहे की फोनमध्ये होल पंच डिस्प्ले डिझाइन आणि रिडिझाइन कॅमेरा आयलंड मिळू शकतो, ज्यात गोळीच्या आकाराच्या मॉड्यूलमध्ये उभ्या स्थितीत तीन कॅमेरे बसवले जाऊ शकतात. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे. हा फोन पुढील वर्षी मार्चमध्ये लाँच होणार असल्याची चर्चा आहे. हे स्लिम बॉडीसह येणार असून त्याची डाइमेंशन १६२.६x७७.९x७.४ मिमी असेल.