मुंबई : भारतीय ग्राहकांना Samsung Galaxy F62 या फोनसाठी आता फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. कंपनी त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी F सिरीजमधील हा नवीन स्मार्टफोन 15 फेब्रुवारीला लाँच करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या या अपकमिंग फोनसाठीचं लँडिंग पेजही अपडेट करण्यात आलं आहे. या फोनच्या लाँचिंग डेटसह या फोनच्या रियर आणि फ्रंट पॅनलच्या डिझाईनवरील पडदा हटवण्यात आला आहे. (Samsung Galaxy F62 is coming to India on February 15)
सॅमसंगच्या या फोनमध्ये पंचहोल डिझाईनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याच्या रियर पॅनेलवर ग्रेडियंट फिनिश आणि एलईडी फ्लॅश सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात टिप्स्टर मुकुल शर्माने दावा केला होता की, Samsung Galaxy F62 हा फोन एका फ्लॅगशिप प्रोसेसरसोबत लाँच केला जाणार आहे. जो स्नॅपड्रॅगन 765 जी पेक्षा अधिक दमदार असेल. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गीकबेंच लिस्टिंगवर हा फोन Exynos 9825 चिपसेट सोबत पाहायला मिळाला होता.
Samsung Galaxy F62 या स्मार्टफोनमध्ये कोणकोणते फीचर्स असतील, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या फोनबाबत काही लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत. त्यामधील माहितीनुसार, या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6.7 इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसोबत लाँच केला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल, तर सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
[Exclusive] Samsung is indeed launching a new F series smartphone. It’s supposed to be a #FullOnSpeedy phone. The multi-core score (2401) will outperform the 765G processor. Price will be less than 25k ?
Hey @samsungindia, which one eh?
Any guesses #stufflistingsarmy? pic.twitter.com/x0dA80sXDz— Mukul Sharma (@stufflistings) February 3, 2021
दक्षिण कोरियाई स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आगामी काळात पाच नवे स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने जोरदार प्लॅनिंग केलं आहे. SamMobile च्या रिपोर्टनुसार हे स्मार्टफोन लो-टू-मिड रेंज सेगमेंटमध्ये असतील. ज्यामध्ये Galaxy F12, Galaxy F62, Galaxy M02, Galaxy A52 आणि Galaxy A72 या स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने जसं प्लॅनिंग केलंय त्यानुसार काम सुरु झालं आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी सॅमसंगने या पाचपैकी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. Galaxy M02 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. या स्मार्टफोनपैकी Galaxy F12, Galaxy F62 हे दोन स्मार्टफोन सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर पाहायला मिळाले आहेत. हे स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सॅमसंग कंपनी आगामी काळात फ्लिपकार्टसोबत भागिदारी करु शकते. कंपनीने 2 फेब्रुवारी रोजी लाँच केलेला Galaxy M02 हा स्मार्टफोन सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर SM-M022G/DS या मॉडेल नंबरसह पाहायला मिळाला होता.
SamMobile च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ऑस्ट्रियामध्ये Galaxy A52 5G चं पेज लाईव्ह करण्यात आलं आहे. तर Galaxy A72 हा स्मार्टफोन कंपनीच्या थायलंड आणि कॅरेबियन वेबसाईटवर पाहायला मिळाला आहे. या रिपोर्टनुसार Galaxy F12 आणि Galaxy F62 स्मार्टफोन एक्सक्लूझिव्हली भारतीय युजर्ससाठी असणार आहेत. तसेच Galaxy M02 हा स्मार्टफोन पूर्णपणे भारतीय युजर्ससाठीच बनवण्यात आला असल्याचे याआधीच सांगण्यात आले आहे. Galaxy A किंवा Galaxy M-लेबल वेरिएंट भारतासह जगभरातील इतरही अनेक देशात लाँच केले जाणार आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, Galaxy A आणि Galaxy M वेरिएंटचे स्मार्टफोन्स जगभरात लाँच केले जाणार आहेत. दरम्यान, सॅमसंगच्या Galaxy A52 आणि Galaxy A72 या स्मार्टफोन्सची युरोपियन मार्केटमधील किंमत ऑनलाईन लीक झाली आहे. गॅलेक्सी क्लबच्या रिपोर्टनुसार या किंमती जर्मन प्राइस कम्पेरिजन साईट Idealo वर लीक झाल्या आहेत.
हेही वाचा
OPPO चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, अवघ्या साडे 12 हजारात धमाकेदार फिचर्स मिळणार
कमबॅकसाठी Nokia सज्ज, जबरदस्त फिचर्ससह दोन ढासू स्मार्टफोन लाँच करणार
प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
MediaTek Dimensity प्रोसेसरसह Realme X7 5G सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
(Samsung Galaxy F62 is coming to India on February 15)