लवकरच Samsung Galaxy Fold लाँच होण्याची शक्यता, पाहा फीचर

| Updated on: Jul 22, 2019 | 7:02 PM

दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग लवकरच आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Samsung Galaxy Fold लाँच करणार आहे. या फोनच्या सर्व टेस्ट पास करण्यात आल्या आहेत. नुकतेच कंपनीने फ्लाइंग कलर्स टेस्टही पास केली आहे.

लवकरच Samsung Galaxy Fold लाँच होण्याची शक्यता, पाहा फीचर
Follow us on

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग लवकरच आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Samsung Galaxy Fold लाँच करणार आहे. या फोनच्या सर्व टेस्ट पास करण्यात आल्या आहेत. नुकतेच कंपनीने फ्लाइंग कलर्स टेस्टही पास केली आहे. यामुळे कंपनी आता फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन ऑगस्टमध्ये लाँच करण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे.

स्मार्टफोन लाँच करण्यापूर्वी सॅमसंगच्या व्हाईस प्रेसिडेंट किम सेओंग-चोल यांनी Samsung Galaxy Fold च्या लाँचिंग बद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे. ते म्हणाले, “Galaxy Fold च्या सर्व समस्या दूर करण्यात आल्या आहेत. आता हा फोन लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे”.

हा स्मार्टफोन सुरुवातीला 26 एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार होता. पण डेवलपर्सने या फोनच्या डिस्प्लेमध्ये काही गोष्टींची कमतरता जाणवल्यामुळे फोन लाँचिंगची तारीख पुढे ढकलण्यात आली. येणाऱ्या नोट 10 च्या सीरीजसह हा फोन ऑगस्टमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनमध्ये 7.3 इंचाचा प्रायमरी फ्लेक्सीबल एमोलेड डिस्प्लेसह कव्हर वरती 4.6 इंचाची स्क्रीन दिली आहे. तसेच 7 एनएम क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टाकोअर प्रोसेस सिस्टम असेल. 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इनबिल्ड स्टोअरेज दिला आहे. फोनमध्ये 16+12+12 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 10 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.

कनेक्टिव्हिटी पाहिली तर Samsung Galaxy Fold मध्ये वायफाय, जीपीएस आणि यूएसबी टाईप-सी सारखे अनेक फीचरचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अजून कंपनीने अधिकृत माहिती दिलेली नाही. पण हा स्मार्टफोन ग्राहकाच्या खिशाल परवडणारा असेल, असं सांगण्यात येत आहे.