मुंबई : सॅमसंग इंडियाने (Samsung India) बुधवारी सॅमसंग गॅलेक्सी एम31 प्राईम (Samsung Galaxy M31 Prime) हा फोन लाँच केला. सणासुदीचे दिवस (दसरा-दिवाळी) आणि सध्या ई-कॉमर्स साईटवर सुरु असलेल्या ऑफर्सना नजरेसमोर ठेवून सॅमसंगने त्यांचा 6000 एमएएच इतकी पॉवरफुल्ल बॅटरी असलेला Galaxy M31 Prime हा फोन लाँच केला आहे. (Samsung Galaxy M31 Prime Launched in India)
या स्मार्टफोनची किंमत 16,499 रुपये इतकी आहे. हा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ओशियन ब्लू, स्पेस ब्लॅक आणि आईसबर्ग ब्लू अशा तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. अमेझॉन डॉट इनसोबत मिळून हा फोन डेव्हलप केलेला असून 17 ऑक्टोबरपासून अमेझॉनच्या अॅप आणि वेबसाईटवरुन हा मोबाईल ऑर्डर करता येईल. सोबतच एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठी दहा टक्के कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे.
सॅमसंगचे नियर डायरेक्टर संदीपसिंह अरोरा म्हणाले की, गॅलेक्सी एम31 प्राईम हा स्मार्टफोन बनवताना आम्ही अमेझॉनसोबत काम केलं आहे. या स्मार्टफोनमध्ये नवीन फिचर्स अॅड करणे आणि आमच्या ग्राहकांना अधिक चांगला स्मार्टफोन प्रदान करणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. या मोबाईलमध्ये पूर्वीपेक्षा अधिक चांगले तंत्रज्ञान वापरले आहेच सोबतच अमेझॉननेदेखील त्यांच्याकडून काही गोष्टी वाढवल्या आहेत. या स्मार्टफोनमध्ये अमेझॉन शॉपिंग, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, अमेझॉन प्राईम म्युझिकसारखे अॅप अगोदरपासूनच इन्स्टॉल केलेले असतील.
स्पेसिफिकेशन
स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचांचा इनफिनिटी यू AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. सोबत सॅमसंग Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
रियर कॅमेऱ्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्लसलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रायड 10 व्हर्जन आहे तर टाईस सी 15 व्हॅट फास्ट चार्जर देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
‘Apple iPhone 12’ ची लाँचिंग तारीख ठरली, पाहा फिचर आणि किंमत
बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री
भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री
बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स
(Samsung Galaxy M31 Prime Launched in India)