मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) लवकरच त्यांच्या M सिरीज अंतर्गत भारतात नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एम33 5जी (Samsung Galaxy M33 5G) लॉन्च करणार आहे. हा फोन भारतात 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एम (Galaxy M) सिरीज फोनच्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगच्या आगामी फोनमध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी आणि 25 W चार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनमध्ये 5nm ऑक्टा-कोर प्रोसेसर देखील असू शकतो. Samsung Galaxy M33 5G मध्ये 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा LCD डिस्प्ले देखील असण्याची शक्यता आहे. फोनच्या रियर पॅनलवर क्वाड रियर कॅमेरा सेटअप देखील असू शकतो.
ई-कॉमर्स कंपनी Amazon ने Samsung Galaxy M33 5G फोनचा टीझर रिलीज केला आहे. म्हणजेच भारतात लॉन्च झाल्यानंतर हा फोन Amazon India च्या साइटवरून खरेदी करता येईल. मात्र, भारतात या आगामी सॅमसंग फोनची किंमत किती असेल हे अद्याप कंपनीने जाहीर केलेलं नाही. Amazon वर शेअर करण्यात आलेल्या फोनच्या टीझरमध्ये 14 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये फोनची इमेजही पाहता येते आणि फोनच्या डिझाईनचाही अंदाज लावता येतो.
मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy M33 5G फोन भारतात दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. त्यापैकी एक 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आणि दुसरा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, एका टिपस्टरने Samsung Galaxy M33 5G फोनबद्दल काही माहिती जारी केली होती. त्यात सांगितले होते की, Samsung Galaxy M33 5G फोन Android 12 आधारित One UI 4.1 सह सुसज्ज असू शकतो. या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देखील असण्याची शक्यता आहे.
या फोनच्या कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस क्वाड रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. यात 50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह 5 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि दोन 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि डेप्थ कॅमेरा सेन्सर असू शकतात. फोनच्या डिस्प्लेमध्ये 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता आहे. याशिवाय Samsung Galaxy M33 5G फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील दिला जाऊ शकतो.
Samsung Galaxy M33 5G expected features
-6.6″ FHD+ IPS LCD Screen
-5nm octa-core Processor
-6GB/8GB RAM
-128GB Storage
-50MP+5MP(UW)+2MP+2MP Rear
-8MP Front
-6000mAh Battery
-Supports 25W Charging (No Charger in the Box)
-Side Fringarprint Sensor
-Android 12
Colour: Blue/Green— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) March 27, 2022
Wanna multitask and do it all with multiple apps, all at the same time? The Samsung #GalaxyM33 5G is up for everything, as long as you are. Be it gaming, streaming, or multitasking, up to 16GB RAM* on the new GalaxyM33 5G packs a punch. pic.twitter.com/Gt1jOlFjwL
— Samsung India (@SamsungIndia) March 27, 2022
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स