मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्यांची सर्वात मोठी तक्रार असते ती बॅटरीची..त्यासाठी अनेक जण स्मार्टफोनसोबत बॅटरी बॅकअप घेऊन फिरतात. खासकरुन गेम्स खेळणाऱ्या युजर्संना सर्वाधिक बॅटरीचे गरज भासते.गेम्स खेळणाऱ्या युजर्संना 5000 एमएएच बॅटरी देखील कमी पडते. असं असताना दुसरीकडे थेट चार्जिंग लावत स्मार्टफोन वापरणाऱ्यांना बॅटरी ओव्हरचार्जिंगची तक्रार देखील भेडसावते. युजर्स स्मार्टफोन चार्जिंग कॉडला लावूनच गेम्स खेळत असतात. अशा पद्धतीने अनेकदा बॅटरीवर दाब येतो आणि विपरीत परिणाम दिसतात.काही मोबाईल कंपन्यांनी बॅटरी फुल चार्ज झाली की, ऑटोमॅटिक बंद होण्यासाठी अॅप डेव्हलप केले आहेत. पण काही स्मार्टफोनमध्ये बॅटरी फुल असतानाही चार्जिंग होत असते. त्यामुळे बॅटरी तापून फुटण्याचे अनेक प्रकार घडतात.आता यावर सॅमसंगनं जबरदस्त उपाय शोधून काढला आहे.
थेट चार्जिंग कॉडला स्मार्टफोन लावून गेम्स खेळणाऱ्यांना यामुळे मदत होणार आहे. दक्षिण कोरियन सॅमसंग कंपनीने नुकतीच एस 23 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये सॅमसंगने गॅलक्सी एस 23 आणि एस 23 प्लस आणि एस 23 अल्ट्रा सीरिज लाँच केली आहे. या स्मार्टफोनमध्ये ही सुविधा असल्याचं बोललं जात आहे.एका लीकर्सच्या म्हणण्यानुसार, गॅलक्सी एस23 मध्ये बायपास चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे.ही सुविधा गेम बूस्टर सेटिंगमध्ये आहे.यूएसबी पॉवर डिलिव्हरी चार्जिंग यामुळे खंडीत होते आणि थेट मोबाईल बॅटरी चार्ज न करता पॉवर वापरता येते. म्हणजेच अशा स्थितीत बॅटरीचा वापर होत नाही. चिपसेटमधून थेट इलेक्ट्रिसिटी वापरता येते. त्यामुळे बॅटरी तापण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे बॅटरीची लाईफ देखील वाढते.
सॅमसंग गॅलक्सी एस23 मध्ये बायपास सुविधा ऑन केल्यास स्मार्टफोन अवघ्या 6 वॅटवर स्मार्टफोन चालतो. तर सामान्य वापरासाठी 17 वॅटची आवश्यकता असते. गॅलक्सी एस23 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट आहे. त्यामुळे न अडखळता गेम्स खेळण्याचा आनंद लुटता येतो. त्याचबरोबर आता अतिरिक्त बॅटरी फीचर्समुळे बॅटरीची लाईफ देखील वाढेल.
सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा
फोनमध्ये 1-120 एचझेड या डायनॅमिक रिफ्रेश रेटसह 6.8-इंच एज क्वाडएचडी प्लस डायनॅमिक अमोलेड 2X डिस्प्ले आहे. यामुळे गेम मोडमध्ये 240 एचझेडचा टच सॅम्पलिंग रेट देतो. हा फोन Android 13 या तंत्रज्ञानावर आधारित असून One UI 5.1 वर काम करतो.या हँडसेटची किंमत जवळपास 98 हजार 300 रुपये आहे.ही किंमत 8 जीबी रॅम / 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 प्रोसेसरसह 12 जीबी रॅम आणि 1 टीबीपर्यंत स्टोरेज आहे.