Galaxy S23 दिसणारे सॅमसंग A34 आणि A54 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
सॅमसंग मोबाईलप्रेमींची गेल्या काही दिवसापासूनची उत्सुकता अखेर संपली आहे. कंपनीने A34 आणि A54 स्मार्टफोन अखेर लाँच केला आहे. हे स्मार्ट गॅलक्सी एस 23 सारखे दिसतात. चला जाणून घेऊयात स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
1 / 5
सॅमसंगने गॅलक्सी ए सीरिजमधील दोन फोनचं लाँचिंग केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ए34 आणि ए54 स्मार्टफोन सादर केले आहेत. या फोनचं डिझाईन जवळपास गॅलक्सी 23 सारखं आहे. बजेट 5 जी स्मार्टफोन असून अँड्रॉईड 13 वर आधारित OneUI 5.1 ओएससह आहे. (Photo: Samsung)
2 / 5
भारतीय बाजारात या मोबाईलची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. येत्या काही दिवसात या दोन्ही फोनची किंमत समोर येईल. युरोपमध्ये गॅलक्सी ए 34 च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत जवळपास 30 हजार रुपये आहे. तर गॅलक्सी ए 54 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 39 हजार रुपये आहे. (Photo: Samsung)
3 / 5
सॅमसंग फ्लॅगशिप फोनमध्ये चार वर्षापर्यंत अँड्रॉईड ओएस अपडेट्स आणि पाच वर्षापर्यंत सिक्युरिटी पॅच बेनिफिट मिळेल. दोन्ही डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 पर्यंत सपोर्ट दिला आहे. सॅमसंग गॅलक्सी ए 34 मध्ये 6.6 इंचाचा एफएचडी + एमोलेड डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी 1080 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. (Photo: Samsung)
4 / 5
यात 48 एमपी+8एमपी+5एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आहे. आणि सेल्फीसाठी 13 एमपी कॅमेरा दिला आहे. ए 34 मध्ये 5000 एमएएच बॅटरी पॉवर आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. पण या फोन बॉक्समध्ये चार्जर नाही. गॅलक्सी ए 54 मध्येही चार्जर नाही. (Photo: Samsung)
5 / 5
गॅलक्सी एक 54 मध्ये 6.4 इंचाचा एफएचडी + अमोलेड डिस्प्ले आहे. यात सॅमसंग EXynos 1380 5 जी चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50 एमपी + 12 एमपी + 5 एमपी रियर कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 32 एमपी कॅमेरा दिला आहे. स्मार्टपोन ग्लास बॅक पॅनल आणि प्लास्टिक फ्रेमसह येतो. (Photo: Samsung)