नवी दिल्ली : जगातील पहिला 5G स्मार्टफोन सॅमसंग लाँच करणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये सॅमसंगचा नवा 5G फोन लाँच करण्यात येणार आहे. हा फोन येणाऱ्या नव्या पीढीसाठी खूप उपयोगी पडेल असा दावा कंपनीने केला आहे. सॅमसंगच्या नव्या 5G स्मार्टफोनचं नाव एस10 5जी असं आहे. सध्या जगभरात अनेक वेगवेगळे स्मार्टफोन लाँच होत आहेत. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन फीचर देत आहे. तसेच सॅमसंगनेही चार कॅमेरा आणि 5G फीचर देत ग्राहकांना आकर्षित केलं आहे.
सॅमसंगने आपल्या नवीन फोनच्या किंमतीबद्दल अजून अधिकृत घोषणा केली नाही. मात्र भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत 1,332 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात अंदाजे 92 हजार रुपये असू शकते. या फोनचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये चार कॅमेरे दिले आहेत. पहिला कॅमेरा 16, दुसरा 12, तिसरा 12 आणि चौथा 0.038 मेगापिक्सल देण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन