स्क्रीन शॉट काढता येणार नाही, ग्रुपवर नंबर दिसणार आणि ग्रुप लेफ्ट केल्याचे कुणाला कळणार नाही; WhatsAppचे भन्नाट फिचर्स

| Updated on: Aug 10, 2022 | 12:02 AM

मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp युजर्सच्या प्रायव्हसीकडे विशेष लक्ष देते. यासाठीच व्हॉट्सॲपने नवे सिक्युरीटी फिचर्स लाँच केले आहेत. यात आपला नंबर ग्रुपवर नंबर दिसणार नाही. तसेच आपण एखादा ग्रुप लेफ्ट केल्याचे कुणाला कळणार नाही तसेच चाट स्क्रिन शॉट काढता येणार नाही. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या नव्या फिचर्सची घोषणा केली आहे.

स्क्रीन शॉट काढता येणार नाही, ग्रुपवर नंबर दिसणार आणि ग्रुप लेफ्ट केल्याचे कुणाला कळणार नाही; WhatsAppचे भन्नाट फिचर्स
Follow us on

नवी दिल्ली : सर्वात लोकप्रिय मेसेंजिग ॲप असलेल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) मध्ये सतत नवीन फीचर्स जोडले जातात. हा इन्सटंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म सातत्याने युजर्सच्या मागण्या आणि गरजेनुसार अपडेट होत असतो. त्यामुळेच गेली अनेक वर्ष हे ॲप जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं आणि वापरलं जाणारं ॲप ठरलं आहे. आता व्हॉट्सॲपने अत्यंत गुपचुपणे असे काही फिचर्स अपडेट केले आहेत की ज्याची युजर्सनी कल्पनाही केली नसेल. स्क्रीन शॉट(Screen shot ) काढता येणार नाही, ग्रुपवर नंबर दिसणार आणि ग्रुप लेफ्ट केल्याचे कुणाला कळणार नाही यासारखे भन्नाट फिचर्स WhatsApp ने अपडेट केले आहेत.

मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp युजर्सच्या प्रायव्हसीकडे विशेष लक्ष देते. यासाठीच व्हॉट्सॲपने नवे सिक्युरीटी फिचर्स लाँच केले आहेत. यात आपला नंबर ग्रुपवर नंबर दिसणार नाही. तसेच आपण एखादा ग्रुप लेफ्ट केल्याचे कुणाला कळणार नाही तसेच चाट स्क्रिन शॉट काढता येणार नाही. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या नव्या फिचर्सची घोषणा केली आहे.

काय आहेत व्हॉट्सॲपचे नवे सिक्युरीटी फिचर्स

  1. या फिचरमुळे ग्रुप लेफ्ट केल्याचे कुणाला कळणार नाही
  2. ऑनलाइन असल्याच आपण ऑलनाईन असल्याचे कुणाला पाहता येईल हे देखील युजर्सला ठरवता येणार आहे. त्यानुसार सेटींग करुन युजर आपल्या कॉन्टॅक्टमधील लोकांची निवड करु शकतात.
  3. व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रीन शॉट काढता येणार नाही. म्हणजे व्ह्यू वन्स सेटींग करुन फोटो अथवा इतर फाईल्स पाठवल्यास याचा स्क्रीन शॉट घेता येणार नाही.

व्ह्यू वन्स मोडमध्ये फोटो-व्हिडिओ कसा पाठवायचा?

व्ह्यू वन्स मेसेज मोडद्वारे पाठवलेला कोणताही फोटो आणि व्हिडिओ फोटो उघडल्यानंतर वापरकर्त्याला पाहता येणार नाही. रिसीव्हर त्यावर टॅप करताच, तो फोटो किंवा व्हिडिओ दिसेल. तो फोटो बंद करताच त्याला मेसेज ऐवजी Opened दिसेल.

  1. सर्वप्रथम तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज करायचा आहे त्याच्या चॅट विंडोवर जा.
  2. मेसेज बॉक्सवर टॅप केल्यानंतर, attachment चिन्हावर टॅप करा.
  3. गॅलरी निवडून तुम्हाला पाठवायचा असलेला व्हिडिओ किंवा फोटो निवडा.
  4. कॅप्शनच्या पुढे एक चिन्ह दिसेल ज्यामध्ये 1 टॅप करा.
  5. नंतर एक पॉप-अप येईल ज्यामध्ये तुम्हाला Ok वर टॅप करुन फोटो-व्हिडिओ सेंड करा

ग्रुपमधील कोणीही तुमचा फोन नंबर पाहू शकणार नाही

अनेक वेळा आपण अशा ग्रुप्समध्ये सामील होतो, ज्यापैकी काहींचे नावही आपल्याला माहीत नसतात. अशा परिस्थितीत ग्रुपमधील सदस्य आपल्या इच्छेविरुद्ध नंबर पाहू शकतात आणि त्याच्या फोनमध्ये सेव्ह करू शकतो, परंतु नवीन फीचर आल्यानंतर ग्रुपमधील इतर सदस्यांना तुमचा मोबाइल नंबर पाहता येणार नाही. हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजवर आहे आणि लवकरच चाचणीनंतर लॉन्च केले जाईल.