आयफोन 15 प्रो मॅक्सच्या या तीन अफलातून फिचर्सची सर्वांना उत्सुकता, पाहा काय नवीन वैशिष्ट्ये

| Updated on: Sep 06, 2023 | 3:49 PM

येत्या आठवडाभरात नवीन आयफोन 15 प्रो मॅक्स बाजारात दाखल होत आहे. त्यामध्ये नेमके काय बदल असणार आहेत ? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आयफोन 15 प्रो मॅक्सच्या या तीन अफलातून फिचर्सची सर्वांना उत्सुकता, पाहा काय नवीन वैशिष्ट्ये
iphone 15
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : आयफोन बाळगणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. आता नवीन आयफोनची सिरीज बाजारात येणार आहे. या नव्या आयफोनमध्ये नेमके काय नवीन फिचर असणार आहेत ? या नव्या आयफोन 15 प्रो मॅक्सची आयफोनचे ( iPhone 15 Pro Max ) जगभरातील चाहते आवर्जून वाट पाहात आहेत. आयफोनची ही नवीन मालिका येण्यासाठी आता आठवड्याभराचा वेळ शिल्लक उरला आहे. येणारी नवीन आयफोन मालिका आणि त्यातील नवीन बदल नेमके काय असणार आहेत. त्याची चुणूक यापूर्वीच लागली आहेत. काय आहेत ती वैशिष्ट्ये पाहूया…

आयफोन 15 मालिकेत युजरसाठी काही वेगळी वैशिष्ट्ये येणार आहेत. त्यातील एक महत्वाचा बदल म्हणजे चार्जिंगसाठी आता USB – C चार्जिंग पोर्ट येणार आहे. हा एप्पल युजरसाठी आतापर्यंतचा सर्वात वेगळा बदल असेल. त्यामुळे युजरना फायदा होईल. एप्पल युजरना आता आपला डीव्हाईस चार्ज करण्यासाठी वेगळ्या चार्जिंग केबलची गरज लागणार नाही. आतापर्यंत iphone 14 सिरीजमध्ये apple युजरना मल्टीपल केबलची गरज लागत होती.

पेरिस्कोप कॅमेराची सोय ?

iphone 15 सिरीज आयफोनचाहत्यांसाठी खास असणार आहे. कारण यात युजरसाठी पेरिस्कोप कॅमेरा असण्याची शक्यता आहे. आयफोन 15 प्रो मॅक्सला पेरिस्कोप कॅमेऱ्यासोबत बाजारात उतरवले जाणार आहे. पेरिस्कोप कॅमेऱ्यामुळे दूरवरील फोटो झुम करुन चांगल्या क्लालिटीसह क्लिक करण्यास मदत होणार आहे.

टायटेनियम चेसिस सोबत आयफोन सिरीज

iPhone 15 सिरीजला टायटेनियम चेसिससोबत बाजारात उतरविले जाण्याची शक्यता आहे. एप्पल स्टेनलेस स्टीलच्या ऐवजी या वेळी नवीन आयफोनना टायटॅनियम चेसिस सह बाजारात उतरवू शकते.

नवा आयफोन वजनाने हलका ?

iphone x सिरीजनंतर आयफोन निर्माती एप्पल कंपनी तिचे आयफोन स्टेनलेस स्टीलच्या बॉडीत आणत आहे. आता अपकमिंग सिरीजमध्ये नवीन बदल होत आहे. टायटॅनियम स्टेनलेस स्टीलपेक्षा वजनाने हलके आहे. त्यामुळे आयफोनचे वजन घटण्याची शक्यता आहे. आयफोन 14 प्रो मॅक्स एक हेव्ही फोन आहे. त्यामुळे नव्या आयफोनमध्ये त्याचे वजन कमी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.