मुंबई : अलिकडेच स्मार्टवॉचचा (Smartwatch) जमाना आहे, असं म्हटलं जातं. तरुणाईच्या हातात स्मार्टवॉच दिसते म्हणजे दिसतेच. यातच स्मार्टवॉच घेण्याचा कल देखील वाढला आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या स्किम्समध्ये देखील या वॉच तुम्हाला ऑनलाईन प्लॉटफॉर्मवर मिळू शकतात. अॅमेझॉनवर (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) सारख्या वेबसाई इलेक्ट्रिक वस्तूंच्या सेलमध्ये या स्मार्टवॉचला आवर्जुन ठेवतात. या वॉचमध्ये देखील वेगळेपण असून वेगवेगळ्या कंपनीच्या आकर्षक आणि अधिक फीचर्स देणाऱ्या अशा स्मार्ट वॉच आहेत. यातच भारतीय इलेक्ट्रॉनिक्स निर्माता Shaaimuनं आपली पहिली स्मार्ट वॉच लाँच केली आहे. विशेष म्हणजे तरुणाईमध्ये या वॉचची चांगलीच चर्चा देखील आहे. या वॉचची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया…
भारतीय इलेक्ट्रॉनिक्स निर्माता Shaaimuनं आपले पहिले स्मार्टवॉच SmartFit Pro 1 लाँच केलीआहे. शैमूनं खासकरून तरुणांसाठी हे घड्याळ लाँच केलं आहे. SmartFit Pro 1 मध्ये 1.69-इंचाचा व्हायब्रंट व्ह्यू डिस्प्ले आहे. हा 240×280 रिझोल्यूशनसह येतो. या घड्याळात फिटनेस आणि आरोग्यासोबतच आठ स्पोर्ट्स मोडही उपलब्ध आहेत. SmartFit Pro 1 मध्ये ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर, रिअल टाइम हेल्थ मॉनिटर आणि ब्लूटूथ कॉलिंग यांसारख्या वैशिष्ट्यांसह देखील येतो.
Shaaimuकडून येणार्या या घड्याळाची किंमत 2,999 रुपये आहे. जरी हे घड्याळ Amazon वर 2,799 रुपयांना दिलेली आहे. तुम्हाला HDFC डेबिट कार्डवर EMI खर्चाशिवाय 10 टक्के झटपट सवलत आहे.
SmartFit Pro 1 प्युअर झिंक अलॉय बॉडीसह येतो. पिंक, ब्लॅक आणि ग्रे या तीन कलर व्हेरियंटमध्ये हे लाँच करण्यात आली आहे. SmartFit Pro 1 एकाच चार्जवर 5 ते 6 दिवस चालवता येते. तर हे घड्याळ सामान्य वापरात 15 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते.
SmartFit Pro 1 मध्ये सायकलिंग, स्किपिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन, धावणे आणि नृत्य असे आठ स्पोर्ट्स मोड आहेत. या घड्याळात 150 हून अधिक वॉच फेस देखील उपलब्ध आहेत. Shaaimu SmartFit Pro 1 च्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर त्यात अनेक आरोग्य कार्ये उपलब्ध आहेत. या घड्याळात स्लीप मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, सेडेंटरी रिमाइंडर, अॅक्टिव्हिटी ट्रॅकर, अलार्म क्लॉक, पेडोमीटर, फोन कॉल, नोटिफिकेशन, म्युझिक प्लेयर, हवामान अंदाज आणि हार्ट रेट मॉनिटर यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.