इन्स्टाग्रामवर शॉपिंग आणखी सोपे होणार; फेसबुकचे व्हिज्युअल सर्चवर काम सुरू

| Updated on: Jun 23, 2021 | 9:51 PM

हे फिचर स्नॅपचॅट आणि पिंटरेस्टमार्फत सादर करण्यात आलेल्या फिचरसारखेच असेल. स्नॅपचॅट आणि पिंटरेस्टने व्हिज्युअल सर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. (Shopping on Instagram will be even easier; Work on Facebook's visual search continues)

इन्स्टाग्रामवर शॉपिंग आणखी सोपे होणार; फेसबुकचे व्हिज्युअल सर्चवर काम सुरू
इन्स्टाग्रामवर शॉपिंग आणखी सोपे होणार
Follow us on

नवी दिल्ली : फेसबुक सध्या शॉपिंग फिचर्सची सोय करण्याबरोबरच इन्स्टाग्रामसाठी व्हिज्युअल सर्च टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. फेसबुकवरील लाइव्ह ऑडिओ रूममध्ये बोलताना मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कंपनी कॅमेरा-आधारीत शोध साधने (सर्च टूल्स) तयार करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. एनगॅजेटच्या म्हणण्यानुसार, हे फिचर स्नॅपचॅट आणि पिंटरेस्टमार्फत सादर करण्यात आलेल्या फिचरसारखेच असेल. स्नॅपचॅट आणि पिंटरेस्टने व्हिज्युअल सर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. (Shopping on Instagram will be even easier; Work on Facebook’s visual search continues)

झुकरबर्गने इन्स्टाग्रामवर तंत्रज्ञानासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन संभाव्य वापरांबाबत रूपरेषा तयार केली आहे. यासंबंधी वृत्तात म्हटले आहे की, इन्स्टाग्राम ब्राऊझ करताना व्हिज्युअल सर्च अ‍ॅपमध्ये आणखी काही उपलब्ध समान उत्पादने समोर आणली जाऊ शकतात किंवा वापरकर्त्यांना आपला कॅमेरा किंवा फोटोंचा वापर करून कॅमेरा रोलमधून उत्पादनांचा शोध घेण्यास मुभा दिली जाऊ शकते.

अशा प्रकारे काम केले जाणार

जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू सापडेल, तेव्हा तुम्ही त्यावर टॅप करू शकाल. तसेच अशाच प्रकारची उत्पादने शोधू शकाल. जी उत्पादने आमच्या सर्व दुकानांमध्ये लोक त्यावेळी विक्री करीत आहेत, असे झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे. आम्हाला वाटते की व्हिज्युअल सर्च वास्तवात फोटोच्या खरेदीसाठी योग्य असे इन्स्टाग्राम बनवण्यास उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

व्यापारविषयक नविन सुविधा देणार

इन्स्टाग्रामवर व्हिज्युअल सर्चव्यतिरिक्त झुकरबर्ग यांनी फेसबुक शॉप्स लवकरच मार्केटप्लेस आणि व्हॉट्सअ‍ॅपवर दाखल होणार असल्याचे जाहीर केले आहे. झुकरबर्ग यांनी याबाबत एक फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, व्यवसायांना हातभार लावण्यासाठी तसेच खरेदी आणखी सुलभ करण्यासाठी व्यापारविषयक नवीन सुविधा दिल्या जात आहेत. या सुविधांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आणि मार्केटप्लेसवरील दुकाने, इन्स्टाग्राम व्हिज्युअल सर्च आणि शॉप जाहिराती यांचा समावेश आहे. अधिक तपशील कमेंट्समध्ये आहे, असेही झुकेरबर्ग यांनी नमूद केले आहे.

काय म्हणाले झुकेरबर्ग?

फेसबुक आधीपासूनच व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये प्रॉडक्ट कॅटलॉग एकत्रित करीत आहे. आता व्यवसाय चॅट अ‍ॅपसाठी स्टोअरफ्रंट बनवू शकतील. कंपनी दुकान जाहिरातींवर (शॉप अ‍ॅड) देखील काम करत आहे. यामुळे व्यवसायांना लोकांच्या वैयक्तिक खरेदीच्या पसंतींवर आधारीत जाहिराती करण्यासाठी अनुमती दिली जाईल, असे झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (Shopping on Instagram will be even easier; Work on Facebook’s visual search continues)

इतर बातम्या

मुंबईतील एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा, इम्तियाज जलील यांचा आरोप, रोख कुणाकडे?

VIDEO : नितीन गडकरींचा ताफा पुढे सरकताच मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकारी-एसपी यांच्यात झटापट, नेमकं काय घडलं?