हल्ली अनेकजण इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे वळत आहेत. अशातच तुम्हाला जर स्वतःसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. कारण कंपनी Simple One Gen 1.5 ही इलेक्ट्रिक स्कूटर त्यांच्या आधीच्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या किमतीत अपग्रेडसह खरेदी करण्याची संधी देत आहे. बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्ट-अप सिंपल एनर्जीने त्यांची Simple One Gen 1.5 ही इलेक्ट्रिक स्कुटर नवीन आवृत्तीसह अपडेट केली आहे. अपग्रेड केल्यानंतरही त्याची एक्स-शोरूम किंमत 1.66 लाख रुपये आहे. तर या आधीच्या सिंपल वनच्या जनरेशन 1ची आवृत्ती असलेली इलेक्ट्रिक स्कुटरची रेंज (IDC) 212 किलोमीटर होती. तर नवीन जनरेशन 1.5 ची रेंज एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 248 किलोमीटर आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही भारतातील सर्वात लांब रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कुटर बनू शकते.
या इलेक्ट्रिक स्कुटरच्या नवीन रेंज व्यतिरिक्त जनरेशन 1.5 मध्ये अनेक सॉफ्टवेअर सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत. यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशन, नेव्हिगेशन, अपडेटेड राइड मोड्स, पार्क असिस्ट, ओटीए अपडेट, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, ट्रिप हिस्ट्री मिळेल. तसेच स्टैटिस्टिक्स, कस्टमाइज़ेबल डॅश थीम, फाइंड माय व्हीकल फीचर, ऑटो-ब्राइटनेस आणि टोन/साऊंड यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी रॅपिड ब्रेक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि यूएसबी चार्जिंग पोर्टही देण्यात आले आहेत.
तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Simple One Gen 1.5 ही स्कुटर डीलरशिपपर्यंत पोहचली आहे. तिथून तुम्ही ते विकत घेऊ शकता. ज्यांच्याकडे आधीपासून Simple One Gen 1 आहे ते सॉफ्टवेअर अपडेटद्वारे त्यांची स्कूटर अपग्रेड करू शकतात. Simple One Gen 1.5 च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला ती आधीच्या स्कूटरच्या 1.66 लाख रुपये (एक्स-शोरूम, बेंगळुरू) मध्ये मिळत आहे. तुम्हाला यामध्ये 750W चा चार्जर देखील मिळत आहे. तसेच ही स्कुटर तुम्हाला बेंगलोर, गोवा, पुणे, विजयवाडा, हैदराबाद, विझाग आणि कोची येथे सिंपल एनर्जीची 10 स्टोअर्स मधून खरेदी करता येईल.
ही इलेक्ट्रिक स्कूटर 2.77 सेकंदात 0-40 किलोमीटर प्रति तासाचा प्रवास करू शकते. आता तुम्हाला यात पार्क असिस्ट फीचर मिळणार आहे. या स्कुटरमध्ये ३० लीटरपेक्षा जास्त स्टोरेज टॉप असल्याचे सांगितले जाते.