स्मार्टफोन चार्जिंग
Image Credit source: Social Media
मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोनने (Smartphone Tips) आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान घेतले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते ऑफिसला जाणाऱ्या लोकांना स्मार्टफोनची गरज आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण अनेक गोष्टी करतो, आता ते ऑनलाइन क्लासेसशी संबंधित असो किंवा ऑफिसचे काम असो, आपण स्मार्टफोनचा दीर्घकाळ वापर करत असतो. दुसरीकडे, फोनची बॅटरी कमी झाली की, आपण लगेच चार्जरकडे धावतो. कारण फोन चार्ज केल्याशिवाय आपण फोन वापरू शकत नाही, पण तुम्हाला माहीत आहे का की फोन योग्य प्रकारे चार्ज केल्याने तुमच्या फोनची बॅटरी आणखी चांगली होऊ शकते? तर दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने फोन चार्च केल्यास तुमच्या फोनवर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत फोन चार्ज करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी लाइफ वाढू शकते.
या चुका टाळा
- अनेकांना रात्री फोन चार्जींगवर लावून झोपण्याची सवय आहे, जी अत्यंत चुकीची आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ फोन चार्ज करणे बॅटरीसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे काही फोनचा स्फोट झाल्या घटना देशील घडल्या आहेत.
- त्याच वेळी, अनेक लोकं फोनची पूर्ण बॅटरी पूर्ण संपल्यानंतर फोन चार्ज करतात, परंतु असे करणे चुकीचे आहे. वास्तविक, फोनमध्ये दिलेली लिथियम-आयन बॅटरी शून्यावर पोहोचू देऊ नये. अशा स्थितीत फोन डिस्चार्ज होण्याची वाट पाहू नये.
- फोनवर कोणतेही अॅप वापरल्यानंतर तुम्ही ते अॅप बंद केले पाहिजे, कारण हे अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालत राहतात आणि त्यामुळे फोनची बॅटरीही खर्च होते.
- याशिवाय अनेक लोक फोन चार्ज करतानाही फोन वापरत राहतात, असे करणे देखील चुकीचे आहे. वास्तविक, चार्जिंग दरम्यान फोनची उर्जा वेगळी असते. अशा परिस्थितीत तुम्ही त्याचा वापर करू नका फोन चार्जिंवर असतांना न बोलण्याचा सल्ला तज्ञ देतात.
- आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की फोन चार्ज करण्यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशन, विमानतळ किंवा कोणत्याही सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर टाळावा. यामुळे तुमचा डेटा हॅकर्सकडे जाण्याची शक्यता आहे.