एलॉन मस्क याने ताबा मिळवण्यापूर्वी ट्विटरची अनेक वर्षांपासूनची ओळख ही निळी चिमणी ही होती. मस्कने ट्विटर खरेदी केले. त्यानंतर त्याने ट्विटरमध्ये अनेक मोठे बदल केले. अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. इतकेच काय कार्यालयीन फर्निचर खुर्ची, टेबल सुद्धा ऑनलाईन विकले. इतक्यावरच न थांबता त्याने ट्विटरचे नाव बदलून ते एक्स (X) असे केले. तर आता अमेरिकेतली सन फ्रेन्सिको येथील मुख्यालयावर असलेली निळ्या रंगात नखशिखांत निघालेली चिमणीचा Logo विक्री करण्यात आला. त्यासाठी बोली लावण्यात आली.
लोगोतून केली मोठी कमाई
निळ्या चिमणीची बोली लावण्यात आली. त्यासाठी 34 हजार 375 डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांत ही चिमणी विक्री करण्यात आली. लिलाव करणाऱ्या कंपनीच्या पीआर एजन्सीने या लिलावाला दुजोरा दिला आहे. या निळ्या चिमणीचे वजन 254 किलो इतके आहे. ती 12 फूट लांब, 9 फूट रूंद आहे. ही चिमणी कोणी खरेदी केली त्याची ओळख पटली नाही.
यापूर्वी बोलीतून कमाई
निळ्या चिमणीची बोली लावण्यात आली, त्याच लिलावात ॲप्पल -1 कम्प्यूटर जवळपास 3.22 कोटी रुपये, स्टील जॉब्सने स्वाक्षरी केलेला ॲप्पलचा एक धनादेश जवळपास 96.3 लाख रुपयात (1,12,054 डॉलर) लिलाव झाला. तर पहिल्या पिढीतील चार जीबी आयफोन, 87 हजार 514 डॉलर मध्ये विक्री झाला. आता निळी चिमणी मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्सचा भाग नसली तरी सोशल मीडियात Apple वा Nike सारखीच तिची खास ओळख आहे.
दोन वर्षांपूर्वी ट्विटरची खरेदी
वर्ष 2022 मध्ये एलॉन मस्क याने मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरची जवळपास 3368 अब्ज रुपयात (44 अब्ज डॉलर) खरेदीची घोषणा केली होती. लोकशाहीत मुक्त विचार मांडण्यासाठी मुक्त संवाद आवश्यक असल्याचे मस्क त्यावेळी म्हणाला होता. ट्विटर केवळ एक सोशल साईट न राहता हा प्लॅटफॉर्म बहुआयामी ठेवण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला होता. आता डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी आल्याने एलॉन मस्क यांच्या एक्सला मोठा फायदा होण्याचे आणि त्यांना कर्ज देणाऱ्या बँकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.