व्हॉट्सॲप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. मेटाने त्याची मालकी घेतल्यानंतर त्यात बरेच बदल झाले आहेत. खरं तर सध्याच्या काळात संवादाचं सर्वोत्तम अॅप म्हणून त्याची गणना होते. या माध्यमातून ऑडिओ व्हिडीओ कॉल करू शकता. इतकंच व्हिडीओ, फोटो, ऑडिओ फाईल पाठवूही शकता. पण याच व्हॉट्सॲपवर काही फीचर योग्य रितीने वापरले नाही तर तुमचं मोठं नुकसान होई शकतं. अनेकदा आपल्या चुकीमुळे कोणाला तरी त्याचा फायदा होतो आणि आपल्यावर पाळत ठेवली जाते. आपल्याला ट्रॅक केलं जातं. व्हॉट्सअॅपवर गेल्या काही वर्षात बरेच अपडेट आले आहेत. आता युजर्संना लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची सुविधा देखील मिळते.
या फिचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन दुसऱ्याला पाठवू शकता. तसेच दुसऱ्याचं लाईव्ह लोकेशन मिळवू शकता. खरं तर हे खूप चांगलं फिचर आहे. यामुळे सदर व्यक्ती कुठपर्यंत पोहोचली याचा अंदाज येतो. इतकंच काय कोणाला पत्ता सापडत नसेल तर तो त्या माध्यमातून योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. पण एक चूक चांगलीच महागात पडू शकते. लोकं आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करतात. यामुळे तुमची गोपनियता धोक्यात येऊ शकते.
तुम्ही जर तुमचं लाईव्ह लोकेशन कोणाला पाठवलं असेल आणि विसरून गेला असाल तर टेन्शन घेऊ नका. व्हॉट्सअॅपवरील एका फीचरमुळे तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन कोणाला पाठवलं आहे हे माहिती करून घेऊ शकता. तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा. होम स्क्रिनवर उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात तीन उभे डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा. यानंतर सेटिंग्स आणि नंतर प्रायव्हेसी ऑप्शनवर आणि त्यात लाईव्ह लोकेशन ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला कळेल की तुम्ही लाईव्ह लोकेशन कोणाला पाठवलं आहे ते. तुम्ही येथूनच लाईव्ह शेअर केलेलं लोकेशन बंद करू शकता.