बाजारात iQoo Z9x 5G या स्मार्टफोनने धुराळा उडवून टाकला आहे. ग्राहकांसाठी कंपनीने आणलेल्या दमदार स्मार्टफोनची एकच चर्चा सुरु आहे. या ताज्या दमाच्या किफायतशीर 5जी स्मार्टफोनमध्ये अनेक खास गोष्टी आहेत. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 50 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आणि 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सध्या बाजारात अनेक मोबाईल दाखल होत आहे. किफायतशीर आणि अनेक फीचर्ससाठी या दमदार फोनचा विचार करु शकता.
बाजूला सेंसर बटण
या iQOO Mobile मध्ये सुरक्षेसाठी या फोनच्या बाजूला एक पॉवर बटण आहे. त्यात सेंसर देण्यात आले आहे. याशिवाय या फोनमध्ये युझर्सला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत स्टोरेज वाढविता येईल. धुळ आणि पाण्याच्या थेंबापासून वाचण्यासाठी IP64 रेटिंग देण्यात आले आहे.
iQoo Z9x 5G Price in India
ताज्या दमाच्या आयक्यू मोबाईल तीन व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे. 4 जीबी रॅमसह 128 जीबीचा व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये, 6 जीबी रॅम/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. या फोनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हे मॉडल खरेदी करण्यासाठी 15,999 रुपये खर्च करावे लागतील.
ॲमेझॉनची ऑफर
हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. या फोनची विक्री 21 मे रोजी दुपारी 12 वाजता कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन आणि ॲमेझॉनवरुन सुरु होईल. हा फोन खरेदी करताना तुमच्याकडे SBI वा ICICI बँक कार्ड असेल तर बिल पेमेंटवर 1 हजार रुपयांची तात्काळ सूट मिळेल.
iQoo Z9x 5G Specifications