सुझुकीची Gixxer SF 250 लॉन्च, किंमत तब्बल…

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : सुझुकीने सोमवारी भारतात एक नवीन स्पोर्ट्स बाईक Gixxer SF 250 लॉन्च केली. Suzuki  Gixxer SF 250 ची शोरुम किंमत 1 लाख 71 हजार इतकी आहे. ही बाईक देशातील बाईक बाजारात एका नव्या पर्वाची सुरुवात करेल, असा दावा सुझुकी कंपनीने केला आहे. Gixxer SF 250 या फुल-फेअर्ड बाईकची डिझाईन यूरोपियन स्टाईलवर आधारित आहे. या […]

सुझुकीची Gixxer SF 250 लॉन्च, किंमत तब्बल...
Follow us on

मुंबई : सुझुकीने सोमवारी भारतात एक नवीन स्पोर्ट्स बाईक Gixxer SF 250 लॉन्च केली. Suzuki  Gixxer SF 250 ची शोरुम किंमत 1 लाख 71 हजार इतकी आहे. ही बाईक देशातील बाईक बाजारात एका नव्या पर्वाची सुरुवात करेल, असा दावा सुझुकी कंपनीने केला आहे. Gixxer SF 250 या फुल-फेअर्ड बाईकची डिझाईन यूरोपियन स्टाईलवर आधारित आहे. या बाईकच्या माध्यमातून सुझुकीने बाजारात फुल-फेअर्ड 250cc सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे.

पावर :

Suzuki  Gixxer SF 250 मध्ये 249cc, सिंगल-सिलिंडर, ऑईल-कुल्ड, फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 9000 rpm वर 26 bhp पावर आणि 7500 rpmवर 22.6 Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचं इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे.

स्टायलिंग :

शार्प फेअरिंग लूकमुळे या बाईकला एक वेगळा लूक मिळाला आहे. यामध्ये शार्प लूक असलेली एलईडी हेडलाईट्स, क्लिपऑन हँडलबार, स्प्लिट सीट्स आणि मल्टी-स्पोक 17 इंच ऑईल व्हील्ज देण्यात आले आहेत. याचं इंस्ट्रूमेंट पॅनल पूर्णपणे डिजीटल आहे. बाईकमध्ये ड्यूअल एग्झॉस्ट सिस्टीम देण्यात आलं आहे. हे Gixxer 150cc सारखं दिसतं.

Suzuki  Gixxer SF 250 च्या फ्रंटमध्ये टेलेस्कोपिक फोर्क्स आणि रिअरमध्ये मोनोशॉक सस्पेंशन आहे. बाईकमध्ये ड्यूअल चॅनल एबीएस देण्यात आलं आहे. या बाईकचं वजन 161 किलोग्राम आहे. याची इंधन टाकी 12 लीटरची आहे. मेटॅलिक मॅट प्लॅटिनम सिल्व्हर आणि मेटॅलिक मॅट ब्लॅक कलर या दोन रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध आहेत.