मुंबई : तुम्ही जर Disney + Hotstar चे युजर असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुठे 31 मार्चपासून तुम्हाला HBO ची सामग्री OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही. कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. डिजनी + हॉटस्टारचा हा निर्णय यूजर्सना आवडला नाही, कारण यानंतर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर अनेक लोकप्रिय शो पाहू शकणार नाही.
HBO चे अनेक लोकप्रिय शो Disney + Hotstar चा भाग होते. यामध्ये द लास्ट ऑफ अस, सॅक्सेशन, गेम ऑफ थ्रोन्स, हाऊस ऑफ द ड्रॅगन, द वायर, द सोप्रानोस, सिलिकॉन व्हॅली आणि इतर शो समाविष्ट आहेत. नुकताच ‘द लास्ट ऑफ अस’ हा शो चांगलाच गाजला आहे.
डिजनी + हॉटस्टार भारतात फक्त HBO च्या लोकप्रिय शो आणि IPL आणि इतर क्रिकेट स्पर्धांमुळे लोकप्रिय झाला पण आता या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आयपीएल सामने किंवा HBO शो बघायला मिळणार नाहीत. डिजनी प्लस हॉटस्टारच्या या निर्णयामुळे यूजर्स प्रचंड संतापले आहेत. यामुळे कंपनीच्या सबस्क्रिप्शन बेसवरही परिणाम होऊ शकतो. सध्या, Disney + Hotstar ची प्रीमियम सदस्यता Rs 1499 मध्ये येते.
IPL सामने आणि HBO सामग्री नसल्याने, वापरकर्त्यांना या किंमतीत सदस्यता आवडू शकत नाही. आयपीएलचे हक्क आता वायाकॉमकडे आहेत. हे जिओ सिनेमावर प्रसारित होणार आहे. फिफा विश्वचषक देखील फक्त जिओ सिनेमावर प्रसारित झाला आहे.
आयपीएलचे अधिकार मिळाल्यानंतर जिओने + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन त्याच्या सर्व प्लॅनमधून काढून टाकले. केवळ जिओच नाही तर एअरटेलनेही डिजनी प्लस हॉटस्टारचे सदस्यत्व त्यांच्या अनेक प्लॅनमधून काढून टाकले आहे.
अशा परिस्थितीत, वापरकर्त्यांना आता स्वतंत्रपणे OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व घ्यावे लागेल आणि त्यावर HBO शो नसल्यामुळे वापरकर्त्यांची निराशा होईल. याचा थेट परिणाम कंपनीच्या सबस्क्रिप्शन बेसवर होऊ शकतो.
एका ट्विटला उत्तर देताना डिजनी + हॉटस्टार म्हणाले, ’31 मार्चपासून, HBO ची सामग्री Disney + Hotstar वर उपलब्ध होणार नाही. तुम्ही Disney + Hotstar वर इतर सामग्री पाहण्यास सक्षम असाल. यात 10 भाषांमधील एक लाख तासांहून अधिक टीव्ही शो आणि चित्रपट आहेत. यावर अनेक जागतिक क्रीडा स्पर्धाही पाहायला मिळतील.