मुंबई : सॅमसंगने (Samsung Smartphone) आपला नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी M14 5G लॉन्च केला आहे. कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये एक नवीन डिव्हाइस सादर केले असून तो 5G सपोर्टसह आहे. हा हँडसेट मार्चमध्ये जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला सॅमसंगचे रेग्युलर डिझाइन, वॉटरड्रॉप नॉच, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले, Exynos 1330 प्रोसेसर, अॅनराॅइड 13 आॅपरेटींग सिस्टम आणि 50MP रिअर कॅमेरा आहे.
अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता. हा फोन 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता उपलब्ध होईल. ही एक प्रास्ताविक किंमत आहे, जी कंपनी नंतर सुधारू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी M14 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD + IPS LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 5 वापरण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 1330 प्रोसेसरवर काम करतो. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.
ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 50MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. समोर 13MP सेल्फी कॅमेरा आहे. डिव्हाइस अॅनराॅइड 13 वर आधारित One UI 5.0 वर कार्य करते. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.