देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे नाक असेल लांबच लांब, कारण पण खास

| Updated on: Dec 02, 2023 | 10:18 AM

Bullet Train Nose | भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची चर्चा आहे. पण त्यापेक्षा बुलेट ट्रेनच्या लांबच लांब नाकाची चर्चा अधिक रंगली आहे. कारण हे नाक 15 मीटर लांब आहे. आता हे नाक इतके लांब ठेवण्यामागे कारण तरी काय असेल? त्याचा नेमका वापर कशासाठी होईल, असे अनेक प्रश्न समोर येत आहे.

देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे नाक असेल लांबच लांब, कारण पण खास
Follow us on

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2023 : भारताची पहिल्या बुलेट ट्रेनचे नाक 15 मीटर लांब आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं लांब नाक कशासाठी असेल बुवा? हा देखावा कशासाठी? पण हा काही देखावा नाही तर त्यामागे एक शास्त्रीय कारण आहे. बुलेट ट्रेन पापणी न लावते तो मोठा पल्ला गाठणार आहे. बोगद्यातून सूसाट धावताना मोठा आवाज होण्याची शक्यता आहे. तर हा गोंगाट कमी करण्यासाठी बुलेट ट्रेनचे नाक इतके लांब ठेवण्यात आले आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेन जपानच्या शिनकानसेन ई-5 सीरीजची पहिली ट्रेन असेल. याविषयीची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (NHSRCL) अधिकाऱ्यांनी दिली. या बुलेट ट्रेनचे नाक 15 मीटर लांब आहे. ही बुलेट ट्रेन 320 किमी प्रति तास वेगाने ट्रॅकवर धावेल. ट्रॅकवरुन धावताना होणारा आवाज कमी करण्यासाठी या लांब नाकाचा उपयोग होणार आहे.

नागरिकांना, प्रवाशांना नाही होणार त्रास

सध्या मुंबई ते गुजरातमधील साबरमती यादरम्यान बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेनच्या ट्रॅकच्या दोन्ही बाजूला नॉईज बॅरियर लावण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशी ठिकाण, औद्योगिक क्षेत्र या भागातील नागरिकांना आणि प्रवाशांना आवाजाचा, गोंगाटाचा कोणताही त्रास होणार नाही. बुलेट ट्रेनमधील आतही या बाहेरील गोंगाटाचा त्रास होणार नाही, अशा प्रकारची रचना आणि इतर उपाय करण्यात आले आहे. जपानमध्ये सध्या जी बुलेट ट्रेन धावत आहे, तशीच ही बुलेट ट्रेन असेल. भारतीय हवामानानुसार त्यात काही बदल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रवास असेल जोरदार

भारतात धावणारी बुलेट ट्रेन एकदम खास असेल. तीला भारतीय वातावरणानुसार तयार करण्यात आले आहे. प्रवाशांना या प्रवासाचा सूखद अनुभव येईल. हा प्रवास एकदम खास व्हावा यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. जगभरातील बुलेट ट्रेनसंबंधीचे अनुभव गोळा करुन त्या आधारावर काही बदल करण्यात येत आहे. हा प्रवास अत्याधिक सूखद आणि धमाकेदार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ताशी 320 किलोमीटरच्या बुलेट ट्रेनमध्ये आपण बसलो आहोत, याची जाणीव प्रवाशांना होणारच नाही. या ट्रेनचे सस्पेंशन जोरदार असतील. त्यामुळे आपण इतक्या वेगाने प्रवास करत आहोत याची प्रवाशांना जाणीव होणारच नाही.