नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : काही पण सर्च करण्यासाठी सर्वात आधी सर्वच जण Google करतात. टाईप करण्याचा वेळ की धडाधड माहितीचे भंडार समोर उघडते. एकाच विषयावर सर्वच एंगलने माहिती मिळते. पण गुगल करताना सावधपणा दाखवणे गरजेचे आहे. ही खबरदारी घेतली नाही तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. काही जण गुगलवर वेडात काही पण शोधतात. पण त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात. गुगलवर काही पण सर्च करणे धोक्याचे ठरु शकते. काही प्रकरणात तर थेट तुरुंगात उचलबांगडी होऊ शकते. आ बैल मुझे मार, अशी तुमची अवस्था होऊ शकते. त्यामुळे Google Search करताना 100 वेळा विचार करावा लागू शकतो.
गुगल माहितीचे भंडार
गुगलवर तुम्ही एखादा शब्द टाकला तर अद्ययावत माहिती धडकन समोरात येऊन बसते. त्यासंबंधीची बातमी, इतर माहिती तुमच्या पुढ्यात येऊन उभी ठाकते. तुम्हाला माहितीचे अनेक कांगोरे कळतात. तुमच्या भाषेनुसार गुगलवर जमा झालेली माहिती तुमच्या समोर येते. त्याआधारे तुम्हाला ज्ञान मिळवता येते. तुमची माहिती अद्ययावत करता येते. अनेक फायदेशीर गोष्टी तुम्हाला गवसतात.
ही चूक करुच नका
जर तुम्ही गुगल सर्च करुन बॉम्ब कसा तयार करतात, त्यासाठी काय साहित्य लागते. ते कोठे उपलब्ध होते. ते कसं मिळवायचं असे कारनामे करत असाल तर तुम्ही अडचणीत आलाच म्हणून समजा. तुम्ही सुरक्षा संस्थांच्या रडारवर याल आणि तुमच्याविरोधात कारवाई पण होऊ शकते.
हा कंटेट शोधू नका
भारतात अश्लील व्हिडिओ साईट केंद्र सरकारने बंद केल्या आहेत. पण तरीही अनेक जण गुगल सर्चवर अश्लील साहित्य शोधतात. हे प्रकरण अंगाशी येऊ शकते. तुम्हाला एखाद्यावेळी चौकशीला बोलवल्या पण जाऊ शकते. अथवा जेलची हवा पण खावी लागू शकते.
फिल्म पायरसी
चित्रपट पायरसी एक गुन्हा आहे. गुगल सर्चच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारात अडकला तर अडचणीत येऊ शकता. देशात चित्रपट पायरसी हा एक गुन्हा आहे. कायदेशीर कारवाईसाठी अनेक कारणं आहे. त्यात गुगल सर्चच्या मदतीने तुम्ही या गुन्ह्यात अडकला तर मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तुरुंगवास अथवा दंडाची तरतूद या कायद्यातंर्गत आहे.
लक्षात ठेवा
केवळ याच गोष्टी नाही तर इतर ही अनेक विषय तुम्हाला अडचणीत आणू शकतात. काही दहशतवादी संघटनांची, त्यांच्या म्होरक्याची तुम्ही माहिती वारंवार शोधत असाल अथवा बेकायदेशीर संघटनांची माहिती काढण्याचा प्रयत्न करत असाल. अशा संघटनांच्या वारंवार संपर्कात येत असाल तर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे गुगल हे ज्ञानाचे भंडार आहे. योग्य माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा. इतर वादात न अडकणे फायदेशीर ठरु शकते.