गुगलवर प्रश्नांची सरबत्ती, दिवाळीत भारतीयांनी सर्वाधिक विचारले हे प्रश्न

| Updated on: Nov 15, 2023 | 11:53 AM

Diwali Google Search | दिवाळीत आनंद साजरा करताना त्यामागील कार्यकारण भाव सुद्धा भारतीयांना जाणून घ्यायचा होता. दिवाळीच्या काळात भारतीयांनी केवळ शॉपिंगविषयीच सर्च केले असेल, असा तुमचा समज असेल तर तो सपशेल खोटा आहे. कारण दिवाळीच्या काळात भारतीयांच्या मनात हे प्रश्न घोळत होते...

गुगलवर प्रश्नांची सरबत्ती, दिवाळीत भारतीयांनी सर्वाधिक विचारले हे प्रश्न
Follow us on

नवी दिल्ली | 15 नोव्हेंबर 2023 : 12 नोव्हेंबर रोजी देशातच नाही तर संपूर्ण परदेशात दिवाळी मोठ्या आनंदोत्सवात साजरी करण्यात आली. दिवाळीची धामधूम यंदा परदेशात पण दिसून आली. या काळात अनेक घरांची खरेदी-विक्री झाली. वाहनं, इतर साहित्य, फराळ, गोड-धोडची मेजवानी झडली. फटाक्यांची आतषबाजी झाली. रांगोळींनी आंगण सजले. लक्ष्मी, गणेश या देवतांची पूजा झाली. पण या काळात गुगलवर सर्वाधिक काय सर्च झाले असेल बरं? तुम्हाला वाटतं असेल की, भारतीयांनी शॉपिंग, स्वस्त डील, ऑफर्सच या गोष्टी सर्च केल्या असतील तर हा तुमचा गैरसमज आहे. भारतीयांनी दिवाळीत या पाच प्रश्नांची सर्वाधिक माहिती शोधली. कोणते आहेत हे प्रश्न?

काय दिली सीईओ पिचाई यांनी माहिती

हे सुद्धा वाचा

दीपावलीत मोठ्या संख्येने गुगलवर रांगोळीविषयीची माहिती घेतली जाते. पूजा पाठ कसे करावे. घर के सजावावे, कोणता रंग द्यावा. प्रदूषणविरहीत फटाके कोणते, फराळ याविषयीची माहिती आतापर्यंत सर्च करण्यात येत होती. यंदाच्या दिवाळीत या पाच प्रश्नांची उत्तरे भारतीयांना हवी होती. याविषयीची माहिती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली. कोणते आहेत हे पाच प्रश्न?

Why हा शब्द झाला ट्रेंड

गुगलचे सीईओ पिचाई यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, दीपावलीच्या काळात Why शब्द ट्रेंड करत होता. गुगलचे सीईओ यांनी सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा दिला. त्यांनी याविषयीचे GIF पण शेअर केला. त्यांनी यावेळी भारतीयांनी कोणते पाच प्रश्न विचारले याची माहिती दिली. या प्रश्नांबाबत भारतीयांनी सर्च केले. सुंदर पिचाई यांनी त्याची माहिती दिली.

कोणते आहेत हे प्रश्न

सुंदर पिचाई यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार भारतीयांना दिवाळी काळात अनेक प्रश्न पडले. त्यातील प्रमुख पाच प्रश्न कोणते अशी उत्सुकता सर्वांनाच लागली. त्याची माहिती पिचाई यांनी दिली.

  • त्यानुसार, भारतीय दिवाळी का साजरी करतात?
  • दिवाळीत आपण रांगोळी का काढतो?
  • दिवाळीत लाईट आणि आकाश दिवा का लावण्यात येतो?
  • दिवाळीच्याच दिवशी लक्ष्मी पूजन का करण्यात येते?
  • दिवाळीत अभ्यंगस्नान का करतात?

दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा

दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा

सुंदर पिचाई यांनी भारतीयांनी सर्वाधिक कोणत्या प्रश्नांची गुगलकडे विचारणा केली याची माहिती दिली. त्यांनी पिचाई यांनी दिवाळीच्या शुभेच्छा पण दिला. दिवाळी साजरी करणाऱ्यांना त्यांनी दिवाळी संदेशासह शुभेच्छा दिल्या. दिवाळी परंपरांविषयी लोकांना रुची असल्याचे या सर्चमधून समोर आल्याचे ते म्हणाले. का, काय या शब्दांची सुरुवात होऊन पुढे भारतीयांनी प्रश्नांनी गुगल सर्च केला.