गुलाबी थंडीपासून 2 हजारात मिळेल उबदार गर्मी, ‘हा’ हीटर आणून तर पहा..

| Updated on: Dec 14, 2024 | 3:58 PM

थंडीच्या दिवसात घरातील वातावरण उबदार ठेवण्यासाठी हा हीटर तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. थंड वातावरण असल्याने अनेकांना घरात राहून सर्दी होते त्यासाठी तुम्ही या हिटरने घरातलं वातावरण उबदार ठेवून सर्दी होण्यापासून रोखू शकता. ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तुम्ही फॅन हीटर 2,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.

गुलाबी थंडीपासून 2 हजारात मिळेल उबदार गर्मी, हा हीटर आणून तर पहा..
हीटर ऑन, थंडी गॉन
Follow us on

थंडीच्या दिवसांमध्ये बाहेरील वातावरण खूप गारवा असतो. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण सुद्धा थंड असते. घरातील थंड वातावरणाचा त्रास हा अनेकांना होत असतो. तसेच या थंडाव्यामुळे काहींना सर्दी होत असते. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही खोलीसाठी, स्टडी टेबलसाठी किंवा स्वयंपाकघरासाठी एक छोटा हीटर खरेदी करायचा आहे? येथे आम्ही तुम्हाला छोट्या रूम हीटरबद्दल सांगत आहोत, ज्याची किंमत 2000 रुपयांपेक्षा खूपच कमी आहे. हा हीटर ‘स्मॉल पॅकेट बिग बँग’ ठरू शकतो. एका व्यक्तीसाठी हे पुरेसे आहे. तसेच ऑनलाईन वेबसाईटने देखील तुम्ही हिटर खरेदी करू शकता. या हीटरसाठी तुम्हाला अनेक पर्याय मिळत आहेत. येथे आम्ही तुम्हाला ऑनलाइन उपलब्ध असलेल्या काही हिटर बद्दल सांगणार आहोत.

Orpat OEH-1220

ऑर्पॅट OEH-1220 हा हीटर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवरून केवळ 1,249 रुपयांमध्ये डिस्काउंटसह खरेदी करू शकता. हा हीटर अतिउष्णतेच्या संरक्षणासह येतो. यात ऑटो-कट फीचर देखील आहे जे खूप गरम झाल्यावर आपोआप बंद होते.

Amazon Brand-Solimo 2000

अमेझॉन ब्रांड-सोलिमो हा हिटर 2000/1000 वॅटमध्ये तुम्हाला मिळेल. हा रूम हीटर तुमच्या खोलीला पूर्णपणे गरम करते. यात तुम्हाला इंडिकेटर्सही मिळतात. याशिवाय तुम्ही त्यात तापमानही नियंत्रित करू शकता. एक हिट सेटिंग नॉब आहे जो तुम्ही तुमच्या स्वत: नुसार सेट करू शकता. या हीटरची मूळ किंमत 2,000 रुपये आहे परंतु ॲमेझॉनकडून 50 टक्के सवलतीसह आपण फक्त 999 रुपयांमध्ये मिळवू शकता.

OSLON 1000: मीशो-ब्लिंकिट

हा हीटर तुम्हाला मिशोवर फक्त ९१४ रुपयांत मिळू शकतो. यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळत आहेत. या हिटरला तुम्हाला हवं असलेल्या तापमानात सेट करू शकता. तर Usha Convector फॅन रूम हीटर ब्लिंकिटवर तुम्हाला १००० ते २००० रुपयांदरम्यान उपलब्ध आहे. मिशो आणि ब्लिंकिट या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून तुम्ही कोणतेही हीटर खरेदी करू शकता.

O PLUS Racer

तुम्हाला 1000/2000 वॅट असलेला हीटर सर्वाधिक किंमतीत मिळत आहे. फ्लिपकार्टवर ७९ टक्के सूटसह केवळ ७८९ रुपयांत हा हिटर तुम्ही खरेदी करू शकता. या हिटरमध्ये फारसे वजन नसते. तुम्ही या हिटरला तुम्ही खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता.