मुंबई : जर तुम्ही गुगल अर्थ (Google Earth) वापरत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल की ते किती उपयोगाचे आहे, तुम्ही जगातील कोणत्याही ठिकाणी कधीही योग्य ठिकाणी पोहोचू शकता. याशिवाय गुगल मॅपमुळे प्रवासात मोठी मदत होते. फक्त नकाशाच नाही तर आणखीही बरीच माहिती आपल्याला यामुळे वेळेआधीच कळते. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? गुगल अर्थ वरचे अनेक ठिकाणं काहिशी भितीदायक आणि विचीत्र आहेत. ती पाहिल्यानंतर तुम्हीही थोडे घाबराल जर तुम्हाला आजपर्यंत अशा लोकेशन्सबद्दल माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्यातील काही ठिकाणांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
इराकमधील सदर शहराच्या बाहेर, 33.396157° N, 44.486926° E च्या लोकेशनवर, तुम्हाला एक लाल तलाव दिसतो, त्याला ब्लडी लेक असेही म्हणतात कारण त्याचा रंग रक्तासारखा लाल दिसतो आणि तुम्ही तो झूम करून पाहू शकता. हे थोडे भितीदायक आणि विचीत्र आहे. जर तुम्ही आजपर्यंत हे स्थान गुगल मॅपवर पाहिले नसेल तर तुम्ही ते अवश्य पहा. हा तलाव इराकच्या बगदाद शहरात आहे.
न्यू मेक्सिकोच्या मेसा ह्युरफानिटा जवळच्या वाळवंटात कोरलेल्या या दोन मोठ्या हिऱ्यासारख्या रचना आहेत. एका प्रख्यात लेखकाने दावा केला आहे की साइट चर्च ऑफ सायंटोलॉजीशी संबंधित लपलेले बंकर चिन्हांकित करते. त्यांच्या वेबसाइटनुसार, सायंटोलॉजी हा “एक धर्म आहे जो एक अचूक मार्ग प्रदान करतो जो एखाद्याच्या खऱ्या आध्यात्मिक स्वभावाची संपूर्ण आणि निश्चित समज देतो आणि त्याचा स्वत:, कुटुंब, गट, मानवजाती, सर्व जीवसृष्टी, भौतिक विश्व, अध्यात्मिक विश्व यांच्याशी असलेला संबंध. खरे काय आहे याबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका असल्या तरी अनेक जन याला एलीयन बंकर म्हणतात.
72°32’27″S 31°19’23″E
हे लोकेशन आणखीनच विचित्र आहे कारण इथे अजून कोणीही गेलेले नाही आणि जी काही माहिती समोर आली आहे ती फक्त गुगल अर्थवरूनच समोर आली आहे. या ठिकाणी तुम्हाला मानवी मृतदेहासारखे चित्र दिसेल. हे नेमके काय काहे कोणालाच सांगता येणे शक्य नाही. करण हा भाग कायम बर्फाने झाकलेला असतो. विशेष म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत कोणालाही शक्य झालं नाही.