जर एखादी कंपनी एका प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २०० जीबीपेक्षा जास्त डेटा देत असेल तर नक्कीच तुम्ही नकार देऊ शकणार नाही. एवढ्या डेटामध्ये तुम्ही तुमच्या घरासोबतच ऑफिसची सर्व कामं हाताळू शकता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रोज तासंतास सिनेमे आणि टीव्ही शो बघितले तरी हा डेटा संपणार नाही. अशीच भारतातील प्रसिद्ध सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली बीएसएनएल त्यांच्या एका प्लॅनमध्ये तेही दररोज २०० जीबीचा डेटा देत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये इतरही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. कोणत्या आहेत त्या ऑफर जाणून घेऊयात.
बीएसएनएल फायबर रुबी ओटीटी ब्रॉडबँड प्लॅन
बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये कंपनी दरमहिन्याला ग्राहकांना ६५०० जीबी डेटा देत आहे. म्हणजेच तुम्ही दररोज २०० जीबीपेक्षा जास्त डेटा वापरू शकता. हा डेटा ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला ३०० एमबीपीएसचा स्पीड मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला हा ब्रॉडबँड प्लॅन घेतल्यावर डेटा बॅलन्स आणि स्पीड या दोन्हीगोष्टींची चिंता करावी लागणार नाही. हा सगळा डेटा तुम्ही संपूर्ण दिवस कसाही वापरला तरी तुमचं इंटरनेट बंद होणार नाही. 40 एमबीपीएस च्या स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट वापरता येणार आहे. याशिवाय अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलिंगचा ही फायदा तुम्हाला यात मिळणार आहे.
अनेक ओटीटी ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार
बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये तुम्हाला फक्त इंटरनेट डेटा आणि कॉलिंग मिळत नाही तर यासोबतच सरकारी टेलिकॉम कंपनी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शनही देत आहे. या प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टार, हंगामा, लायन्स गेट, शेमारू मी, शेमारू, सोनीलिव्ह प्रीमियम, Zee5 प्रीमियम आणि YuppTV चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते. अशा आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दरमहा 4,799 रुपये मोजावे लागणार आहे.
बीएसएनएल स्वस्त प्लॅनही देत आहे
एवढा महागडा प्लॅन न घेता स्वस्त प्लॅन घ्यायचा असेल तर बीएसएनएलचा फायबर एंट्री ब्रॉडबँड प्लॅन हा चांगला पर्याय आहे. यात २० एमबीपीएस स्पीडसह दरमहा १००० जीबी डेटा मिळतो. यात तुम्हाला अनलिमिटेड डेटा डाऊनलोड आणि फ्री व्हॉईस कॉलिंगदेखील मिळेल. या प्लॅनची किंमत दरमहा 329 रुपये इतकी आहे.