Best Camera Phones: बेस्ट कॅमेरावाले बजेट स्मार्टफोन्स, किंमत 10 हजारांहून कमी

| Updated on: Apr 18, 2022 | 3:23 PM

Best Budget Camera Phones : 10 हजारांपेक्षा कमी किंमत व त्यात बेस्ट कॅमेरा क्वालिटी असलेले स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. ज्या ग्राहकांना वाजवी दरात परंतु चांगल्या कॅमेरा क्वालिटीचे फोन हवे आहेत, त्यांच्यासाठी हे फोन एक चांगले पर्याय ठरु शकतात. 2022 मधील या टॉप 5 स्मार्टफोन्सची माहिती या लेखातून घेणार आहोत.

Best Camera Phones: बेस्ट कॅमेरावाले बजेट स्मार्टफोन्स, किंमत 10 हजारांहून कमी
5 Best Budget camera Smartphones
Image Credit source: Canva
Follow us on

मुंबई : कुठल्याही स्मार्टफोनची (Smartphones) खरेदी करीत असताना खरेदीदार सर्वात प्रथम फोनची कॅमेरा क्वालिटी तपासून बघत असतो. किती किती मेगापिक्सलचा आहे, झुमिंग लेंस कशी आहे, झूम केल्यावर फोटोची क्वालिटी खराब होतेय का? अशा विविध पातळ्यांवर पडताळणी करुनच स्मार्टफोनची खरेदी केली जात असते. अनेकदा चांगल्या कॅमेरा क्वालिटीच्या फोनची किंमत आवाक्याबाहेर असते. परंतु आता तुमच्या बजेटमध्येच (Budget) चांगल्या कॅमेरा क्वालिटी असलेल्या स्मार्टफोनची माहिती या लेखातून देणार आहोत. तुमच्यासाठी 2022 मध्ये भारतातील दहा हजारांहून कमी किंमत असलेले बेस्ट कॅमेरा (Camera) फोनची यादीच घेऊन आलो आहोत. या यादीत रियलमी, सॅमसंग, ओप्पो, विवो, आणि इनफिनिक्स या फोनचा सहभाग आहे.

Micromax In 2b

हा स्मार्टफोन ॲन्ड्रोईड 11 वर काम करतो. त्याच बरोबर Unisoc T610 ऑक्टाकोर SoC ने परिपूर्ण आहे. याला 6GB रॅमसोबत जोडण्यात आले आहे. कंपनीने Micromax In 2b ला दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. ज्यात 4GB + 64GB ऑप्शन आहे. याची किंमत केवळ 7 हजार 999 इतकी आहे. 6GB + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 8 हजार 999 इतकी आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 13 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा व 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. त्यासोबत सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 एमपीचा फ्रंट कॅमेराचा समावेश आहे.

2. Xiaomi Radmi 9 prime

Xiaomi बजट सेगमेंटमध्ये हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यातदेखील 4GB + 64GB ऑप्शन आहे. याची किंमत 9 हजार 999 इतकी आहे. 4GB + 128GB ची किंमत 11 हजार 999 आहे. 6.63 इंचाची फूल एचडी + आईपीएस डिसप्ले, 1080 × 2340 पिक्सलचे रिझॉल्यूशनसह Xiaomi Radmi 9 prime लाँच करण्यात आला आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने एआई क्वाड कॅमेरा सेटअप दिले आहे. ज्यात f/2.2 अपर्चरसोबत 13 एमपी मेन कॅमेर्याचा समाविष्ठ आहे. 8 एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा + 5 एमपी चा शुटर +2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरही उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 एमपीचा फ्रंट कॅमेर्यासोबत वाटरड्रोप नॉच कटआउट देण्यात आले आहे.

3. Realme Narzo 30A

720×1600 पिक्सेलच्या रिझॉल्यूशन सोबत 6.5 इंच मिनी ड्रोप फूल स्क्रीन डिसप्ले देण्यात आला आहे. गेमिंग प्रोसेसर असलेल्या Media Tek Helio जी85 ने हा स्मार्टफोन परिपूर्ण आहे. बॅकअपसाठी Realme Narzo 30A ला 6000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 18डब्ल्यूचे फास्ट चार्जर देण्यात आले आहे. फोटोंसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 13एमपीचा आहे. सेकंडरी लेंसमध्ये f/2.4 अपर्चर सोबत मोनोकोम सेंसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. सुपर नाइट मोड, क्रोम बुस्ट आदी पर्याय देण्यात आले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 एमपीचा कॅमेरा आहे.

4. Poco C3

6.53 इंचाची एचडी + एलसीडी डिसप्ले देण्यात आली असून त्यात वाटरड्रोप नॉच आहे. हा ऑक्टाकोर मीडियाटेक हिलोओ जी35 SoC ने सुसज्ज असा स्मार्टफोन आहे. 3GB आणि 4GB रॅम देण्यात आली आहे. 3GB रॅम व्हेरिएंटमध्ये 32GB स्टोरेज आणि 4GB रॅमे मॉडेलमध्ये 64GBस्टोरेज देण्यात आले आहे. ट्रीपल रिअल कॅमेरा असून त्यात 13एमपी पायमरी लेंस, 2एमपी मॅको सेंसर आणि 2एमपीचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. 5एमपीचा समोरील कॅमेरा आहे.

5. Samsung galaxy F12

सॅमसंग गॅलॅक्सी F12 मध्ये 4GB रॅम + 64GBसह दोन स्टोरेज व्हेरिएंट देण्यात आले आहे. याची किंमत 9 हजार 499 इतकी आहे. तर 4GB रॅमे + 128GB ची किंमत 10 हजार 499 इतकी आहे. यात, सेलेस्टिअल ब्लॅक, सी ग्रीन आणि स्काय ब्लू कलरचे पर्याय उपलब्ध आहेत. 48 एमपीचा पायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. f/2.2 अपर्चर असलेला 2एमपी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर असलेला 2 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. 16 एमपीचा समोरील कॅमेरा आहे.

इतर बातम्या

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात रहा…iPhone 14 ला ‘अशी’ मिळेल कनेक्टिव्हिटी

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme Q5 Pro बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

आता डिलिट नाही भाऊ एडीट कर… ट्वीटर ‘हे’ नवीन फिचर आणण्याच्या तयारीत