मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp ने काही महिन्यांपूर्वी एक फीचर रोलआऊट केलं होतं. पीआईपी मोड असं या फीचरचं नाव आहे. या मोडद्वारे युजर्स चॅटिंगदरम्यान कोणतीही लिंक ओपन करत असला तरी त्याचा चॅटिंग टॅब बंद होणार नाही. युजर्स अगदी सहजपणे एका छोट्या बॉक्समध्ये व्हिडीओ पाहू शकतील. परंतु आता हे फीचर काही Whatsapp युजर्सच्या फोनवर आपोआप बंद झालं आहे. कंपनी सध्या व्हिडीओ म्युट नावाचं एक फीचर रोलआऊट करत आहे. याचदरम्यान जुनं फीचर बंद पडलं आहे. Whatsapp ने नवीन फीचर रोलआऊट करणं सुरु केलं आहे. WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार कंपनी सध्या हे नवं फीचर अँड्रॉयड बिटा युजर्ससाठी रोलआऊट करत आहे. (This WhatsApp feature will allow users to mute videos before sending, know how)
WhatsApp सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स सादर करत आहे. कंपनी सध्या म्युट व्हिडीओ नावांचं फीचर रोलआऊट करत आहे. त्याचदरम्यान कंपनीला काही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच हे नवं फीचर रोलआऊट करताना इतर फीचर्सवर त्याचा परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. WhatsApp युजर्ससाठी PIP (Picture in Picture) मोड हे फीचर त्यांच्या आवडीचं आहे. परंतु सध्या हे फीचर नीट काम करत नाही. दरम्यान, WABetaInfo ने ट्विट करुन माहिती दिली आहे की, WhatsApp मध्ये आता युट्यूब (youtube preview) प्रीव्ह्यू पाहतानाही अडचणी येत आहेत. युजर्सना PIP मोड द्वारे युट्यूब व्हिडीओ पाहता येत नाही.
WhatsApp ने युझर्सच्या चॅटिंग एक्सपिरिअन्सला आणखी चांगलं करण्यासाठी नव-नवीन फीचर्स (WhatsApp Sticker Shortcut Feature) लॉन्च करत असतो. आता WhatsApp ने नवीन Sticker Shortcut नावाचं फीचर देण्याची तयारी केली आहे. WhatsApp चं हे फीचर लवकरच ग्लोबल युझर्सला रोलआउट केलं जाऊ शकतं
WhatsApp मध्ये येणारे स्टीकर शॉर्टकट फीचर ची माहिती WABetaInfo ने दिली. रिपोर्टच्या माहितीनुसार, हे फीचर चॅट बारमध्ये दिसेल, रोलआऊट झाल्यानंतर युझर्सला चॅट बारमध्ये इमोजी एंटर करणे किंवा कुठला शब्द लिहिण्यासाठी वेगळे रंग असलेले आयकॉन दिसतील. तर, कीबोर्डला एक्सपान्ड करण्यावर WhatsApp चे सर्व स्टीकर दिसतील. WABetaInfo नुसार, कंपनीने या फीचरला सध्या अँड्रॉईड डिव्हायसेससाठी तयार करत आहे. लवकरच या फीचरला WhatsApp Beta युझर्ससाठी रोलआऊट केलं जाऊ शकतं (WhatsApp Sticker Shortcut Feature).
? WhatsApp beta for Android 2.21.2.10: what’s new?
• New sticker pack available: Sumikkogurashi.
• UI Improvements for the new sticker shortcut feature, available in a future update!https://t.co/WrEWBnIdWK— WABetaInfo (@WABetaInfo) January 20, 2021
स्टीकर शॉर्टकट शिवाय कंपनीने अँड्रॉईड आणि iOS बेस्ड अॅप्ससाठी नवीन अॅनिमेटेड स्टीकर पॅकला रिलीज केलं. हे फीचर WhatsApp Web साठी उपलब्ध आहेत. 2.4MB च्या साईज असलेल्या स्टीकर पॅकचं नाव Sumikkogurashi आहे. जगभरात WhatsApp युझर या फीचरला WhatsApp स्टीकर स्टोअरमधून डाउनलोड केलं जाऊ शकतं.
हेही वाचा
WhatsApp आणि Signal वर मात करत Telegram ठरलं सर्वाधिक डाऊनलोड होणारं अॅप
Aadhaar Card | पालकांनो लहान मुलांचे आधार कार्ड बनवलेत का? लवकरच भासू शकते गरज…
(This WhatsApp feature will allow users to mute videos before sending, know how)