ट्रूथटेल हॅकेथॉनच्या 5 विजेत्यांचा सत्कार, 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस

| Updated on: Apr 07, 2025 | 10:37 PM

आसीईए अर्थात इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने पाच इनोव्हेटर्सना सन्मानित करण्यात आलं. या 5 इनोव्हेटर्सना सोशल मीडियावरील चुकीची माहिती, व्हिडीओ आणि माहिती शोधणारी यंत्रणा विकसित केली आहे.

ट्रूथटेल हॅकेथॉनच्या 5 विजेत्यांचा सत्कार, 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस
TruthTtell Hackathon
Image Credit source: PIB
Follow us on

आसीईए अर्थात इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने आज 7 एप्रिल रोजी ट्रुथटेल हॅकेथॉनच्या 5 विजेत्यांची घोषणा केली. या विजेत्यांचा राजधानी नवी दिल्लीत खास सन्मान करण्यात आला. टीम युनिक्रॉन दिल्ली, टीम अल्केमिस्ट डेहराडून, टीम हूशिंग लायर्स बेंगळुरू, टीम बग स्मॅशर्स दिल्ली आणि टीम व्होर्टेक्स स्क्वॉड बंगळुरू यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलं. या इनोव्हेटर्सनी सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात भरीव योगदान दिलंय.

जगातून तब्बल 5 हजार 600 पेक्षा अधिक इनोव्हेटर्सनी नोंदणी केली होती. त्यातून फक्त 5 विजेते ठरले. या 5 विजेत्यांना 10 लाख रुपयांचे एकत्रित रोख बक्षीस देण्यात आले. नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
तसेच या कार्यक्रमात निवडक 25 इनोव्हेटरनी उद्योग तज्ञांच्या पॅनेलसमोर त्यांचं सादरीकरण केलं. हे हॅकेथॉन आगामी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 साठी ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ चा एक भाग आहे.

कोणत्या टीमने काय केलं?

देहरादूनच्या टीम अल्केमिस्टला ‘व्हेरीस्ट्रीम’ फॅक्ट-फर्स्ट इन एव्हरी फ्रेमसाठी सन्मानित करण्यात आलं. हे एक संपूर्ण समाधान आहे, म्हणायला हरकत नाही. लँगचेन-संचालित एनएलपी, डायनॅमिक नॉलेज ग्राफ, जीआयएस इनसाइट्स आणि एक्सप्लेनेबल एआय वापरून लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये चुकीची माहिती शोधून दुरुस्त करते.

बंगळुरूच्या टीम हूशिंग लायर्सना नेक्सस ऑफ ट्रुथसाठी पुरस्कार मिळाला. या माध्यमातून डीपफेक शोधण्यासाठी, बातम्यांमधील तथ्य तपासणी आणि रिअल टाइममध्ये फेक कंटेंट रोखण्यासाठी डिझाइन केलं आहे. हे एआय टुल आहे. या माध्यमातून बहुभाषिक कंटेंट आणि लाइव्ह-स्ट्रीमिंग अलर्ट आहेत.

दिल्लीतील टीम बग स्मॅशर्सना लाईव्ह ट्रुथ या एआय पॉवर्ड मिसइन्फॉर्मेशन डिटेक्टरसाठी पुरस्कार देण्यात आला. स्थानिक लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) आणि फॅक्ट-चेकिंग एपीआय एकत्रित करून रिअल-टाइम विश्वासार्हता स्कोअर प्रदान करतो. तसेच लाईव्ह ब्रॉडकास्ट दरम्यान जीपीएस-आधारित एसएमएस पडताळणीद्वारे समुदाय-चालित प्रमाणीकरण देखील प्रदान करते.

बंगळुरूच्या टीम व्होर्टेक्स स्क्वॉडने रिअल-टाइम चुकीची माहिती शोधणं आणि फॅक्ट चेकमध्ये प्राविण्य मिळवलं आहे. हे एक एआय-टुल आहे. याद्वारे लाईव्ह इव्हेंट्स दरम्यान चुकीची माहिती शोध आणि रिअल टाइममध्ये अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करते.

दिल्लीतील टीम युनिक्रॉनला त्यांच्या नाविन्यपूर्ण शैलीसाठी सन्मानित करण्यात आलं. या माध्यमातून कंटेंट, फोटो आणि व्हीडिओंमधील चुकीची माहिती शोधण्यासाठी मदत झाली. या टीमची ही कामगिरी पाहता त्यांना पुरस्कार देण्यात आला.

हे पाच इनोव्हेटर्स आहेत, ज्यांनी सोशल मीडियावरील चुकीची माहिती, व्हीडीओ आणि माहिती शोधणारी यंत्रणा विकसित केली आहे. या माध्यमातून लाईव्ह, डीपफेक वगैरे व्यवस्थितरित्या तपासलं जातं. या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित होण्यापासून रोखली जाईल. ज्यामुळे चुकीच्या माहितीला आळा बसेल आणि नको ती स्थिती उद्भवणार नाही.

या वरील 5 संघांनी लाईव्हद्वारे माध्यमांच्या अखंडतेत सुधार करण्यासाठी आणि चुकीची माहिती रोखण्यासाठी सादरीकरण केलं.
मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान वेव्हेज समिटचं आयोजन करण्यात येणार आहे. या समिटमध्ये या 5 संघांनी केलेले सादरीकरण दाखवण्यात येणार आहे. मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवीन उपक्रमांच्या प्रोत्साहनासाठी हे ‘हॅकेथॉन वेव्हज 2025 चा भाग आहे.

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनबाबत थोडक्यात

दरम्यान आयसीएईए ही भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांसोबत काम करणारी एक प्रमुख उद्योग संघटना आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये भारताला जागतिक तंत्रज्ञान महासत्ता बनवण्याचे आयसीएईएचं ध्येय आहे.