हल्ली प्रत्येक जण स्मार्ट फोन (Smart Phone) वापरत असतो. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अॅप्लिकेशन्स पाहायला मिळतात. हल्ली अॅप्लिकेशनचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. चॅटिंगपासून ते व्हिडिओकॉलपर्यंत आणि पेमेंट करण्यापासून ते वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी प्रामुख्याने आपण अॅप्लिकेशनचा वापर करत असतो. या सगळ्या सोशल मीडिया अॅप्लिकेशन (Social media application) मध्ये प्रामुख्याने फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्लिकेशनचादेखील समावेश आहे. विशेष करून कोरोना काळापासून या सर्व अॅप्लिकेशनचा वापर प्रामुख्याने वाढलेला दिसतो आहे. याकाळादरम्यान प्रत्येक जण मोबाइलचा वापर जास्त प्रमाणात करत होता आणि म्हणूनच अनेकांनी आपल्या मोबाइलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅप्लिकेशनदेखील इन्स्टॉल (Install) करून ठेवले होते. त्यामुळे त्यांचा वेळ सहजच जात असे.
या सगळ्या अॅप्लिकेशनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. परंतु बहुतेकवेळा फसवणुकीच्या अनेक घटनादेखील मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागल्या. वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कंपनी आपल्याला सिक्युरिटी फिचर्स (safety features) पुरवण्याचा दावा करत असतात. व्हाट्सअप वापरकर्त्यांची चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी एंड टू एंड एन्क्रिप्शनचा वापर करतो. याशिवाय फेसबुक आणि फेसबुकचे फोटो शेअरिंग अॅप्लिकेशनसुद्धा वेगळ्या प्रकारचे सेफ्टी फीचर्स ऑफर करतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये मोबाइल डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्याला काही फीचर्स बद्दल जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
व्हाट्सअप वापरकर्त्यांना त्यांची चॅट किंवा प्रोफाइल पिक्चर आणि स्टेटस अपडेट करण्यासंदर्भातील अनेक वेगवेगळे सुरक्षित फ्युचर्स ऑफर करत असतो. सुरुवातीला ही सुरक्षितता तपासण्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्मवर टू स्टेप ऑथेंटिकेशन अनेबल करू शकतात, जेणेकरून तुमचा प्रोफाइल फोटो कोणालाही घेता येणार नाही. तुम्ही तुमचे लास्ट सिन, अबाऊट प्रोफाइल फोटो आणि स्टेटस या सर्व गोष्टी लपवू सुद्धा करू शकतात.
फेसबुक आपल्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सिक्युरिटी फिचर्स ऑफर करत असतो, जेणेकरून सर्वांचा व्यक्तीगत डेटा व व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहावी तसेच या माहितीचा कोणीही करू नये, म्हणून फेसबुक वेगवेगळ्या प्रकारचे सेक्युरिटी फीचर्स ऑफर करत असतात. वापरकर्ते आपल्या डेटाला आणि प्रोफाइलला सुरक्षित ठेवू शकतात. आपले खाते सुरक्षित करण्यासाठी यूझर्सला टू स्टेप ऑथेंटिकेशन करावे लागते, जेणेकरून तुमच्या प्रोफाइल कोणीच अॅक्सेस करू शकत नाही. याशिवाय तुम्ही तुमचे प्रोफाइल लॉकदेखील करू शकता. तुम्ही काही लोकांना लिमिटेड करून तुमची माहिती ठराविक लोकांसाठी पोस्ट करू शकतात. जेणेकरून तुम्ही लोकांना सहज संपर्क साधून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता.
इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया अॅप्लिकेशन जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हे अॅप्लिकेशन व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरकर्ते वापरतात. मेटा च्या अन्य प्लॅटफॉर्म प्रमाणेच इन्स्टाग्रामसुद्धा त्यांच्या वापरकर्त्यांना सेक्युरिटी फीचर्स ऑफर करतो जेणेकरून आपल्या अकाउंटची माहिती दुसऱ्या अकाउंट व्यक्तींसोबत शेअर केली जाऊ नये. जर आपल्याला आपल्या इन्स्टाग्रामचे खाते सुरक्षित ठेवायचे असल्यास त्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा 2FAसिक्योरिटी फीचर्स उपलब्ध आहे. इन्स्टाग्राम आपले प्रोफाइल प्रायव्हेट करण्याचादेखील फिचर देतो. तुम्ही प्रोफाइल प्रायव्हेट करून आपली प्रोफाइल लिमिटेडलोकांसाठी खुली ठेवू शकता.
तुम्ही कोणत्याही पोस्ट किंवा स्टोरीवर कमेंट सेक्शन बंद करू शकता. त्याचबरोबर कोणत्या अकाउंटला तुमची स्टोरी दिसावी व दिसू नये याबद्दलचे ऑप्शनदेखील इन्स्टाग्राम तुम्हाला पुरवत असतो. आपण ठराविक पोस्ट निवडून त्या टॅग करू शकतो. जेणेकरून तुमची प्रोफाइल तुमच्या परवानगीशिवाय पब्लिक पोस्टमध्ये डिस्प्ले होणार नाही.