मुंबई : टीव्हीएसने (TVS) आपल्या सर्वात पॉपुलर स्कूटर ज्युपिटरचा (Jupiter) नवीन ग्रँड एडिशन लाँच केला आहे. विशेष म्हणजे टीव्हीएसचा (TVS) हा नवा मॉडल आपण मोबाईलशी कनेक्ट करु शकणार आहे. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर ‘SmartXonnect’ दिलेले आहे. या स्कूटरची किंमत 59 हजार 900 रुपये आहे.
यापूर्वीही कंपनीने टीव्हीएस ज्युपिटर ग्रँडची विक्री केली होती. पण यानंतर हा मॉडल बंद करुन त्याऐवजी ZX वेरिअंट लाँच केला. आता पुन्हा एकदा कंपनीने नवा टीव्हीएस ज्युपिटरचा मॉडल बाजारात लाँच केला आहे. जुन्या ज्युपिटरच्या तुलनेने नव्या मॉडलची किंमत फक्त 252 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला 59 हजार 900 रुपये TVS ज्युपिटर घरी घेऊन जाता येणार आहे.
ज्युपिटरच्या या नव्या वेरिअंटमध्ये SmartXonnect फीचरने एका अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन स्कूटरसोबत कनेक्ट करु शकता. यामुळे तुम्ही कॉल, टेक्स्ट, ओव्हरस्पीडिंगसाठी अलर्ट आणि ट्रिपबद्दलची सर्व माहिती मिळेल. याशिवाय स्कूटरच्या एनालॉग-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये स्पीड, ट्रिप मीटर आणि ओडोमीटर रीडिंग्स आणि फ्यूल लेवलची माहिती मिळेल.
फीचर्स
यामध्ये क्रोम बेजल्ससह एलईडी हेडलॅम्प, ड्यूअल-कलर 3डी लोगो, फ्रंट फेंडर्स आणि रिअर व्ह्यू मिरर्सवर क्रोम फिनिश, प्रिमिअम मरुन कलर सीट्स, बेज इंटीरिअर पेनल्स आणि मशीन ड्यूअल-टोन अलाय व्हील दिली आहे. स्कूटर टेक ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे.
इंजिन
यामध्ये 109.7 सीसी, सिंगल सिलेंडर, एअरकूल इंजिन दिले आहे. जे 7.99पीएस आणि 8.4 एनएम टॉर्क जनरेट करते. सस्पेंशनमध्ये फ्रंटला टेलेस्कोपिक फोर्क आणि रिअरमध्ये प्रीलो़ड-अॅडजस्टेबल शॉक अब्जॉर्बर दिले आहे.