नवी दिल्ली: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सूचनेनुसार ट्विटरनं 250 वापरकर्त्यांची अकाऊंटस ब्लॉक केली आहेत. त्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘Modi Planning Farmer Genocide ‘ हा हॅशटॅग चालवण्यात आला होता. त्याद्वारे चुकीची आणि प्रक्षोभक वक्तव्य 30 जानेवारीला केली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्विटरनं केलेल्या कारवाईत प्रसार भारतीच्या सीईओचे ट्विटर अकाऊंट देखील सस्पेंड करण्यात आलं आहे. (Twitter to block around 250 Tweets/Twitter accounts including Prasar Bharati CEO account)
केंद्रीय गृहमंत्रालय आणि कायदेविषयक संस्थांच्या विनंतीवरुन केंद्रीय आयटी मंत्रालयाकडून ट्विटरला संबंधित अकाऊंटसवर कारवाई करण्याबाबत कळवण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात संबंधित ट्रेंडमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 250 जणांची अकाऊंटस ब्लॉक करण्यात आली आहेत, अशी माहिती मिळतेय. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे.
Ministry of Electronics and IT (MEITY) directed Twitter to block around 250 Tweets/Twitter accounts which were using ‘Modi Planning Farmer Genocide’ hashtag & making fake, intimidatory & provocative Tweets on Jan 30: Sources on Twitter Accounts being withheld pic.twitter.com/LIvZjbevRX
— ANI (@ANI) February 1, 2021
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या सूचनेनुसार 250 ट्विटर अकाऊंटस ब्लॉक करण्यात आली आहेत. ट्विटरच्या या निर्णयाचा फटका प्रसार भारतीचे सीईओ शशि शेखर यांना बसला आहे. शशि शेखर यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक कऱण्यात आलं असून प्रसार भारतीनं त्याबाबत ट्विटर इंडियाला प्रश्न विचारला आहे. प्रसारभारतीनं ट्विटर आणि ट्विटर इंडियाला टॅग करुन प्रसारभारतीच्या सीईओच्या ट्विटरवर झालेल्या कारवाईबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. प्रसार भारतीनं ट्विटरवर त्याबाबत फोटो शेअर केला आहे. Account Withheld. Your Account has been withheld in India in response to a legal demand असा उल्लेख त्यावर करण्यात आलाय म्हणजेच कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झाल्यानंतर तुमचं अकाऊंट बंद करण्यात आलं आहे.
ट्विटरनं कारवा मॅगझिन, अभिनेता सुशांत सिंह, किसान एकता मोर्चा, आपचे आमदार जनरल सिंह यांच्या ट्विटर अकाऊटला ब्लॉक करण्यात आलयं. कॉ. कन्हैय्या कुमार याचे अकाऊंट देखील सस्पेंड करण्यात आले होते ते पुन्हा रिस्टोर करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या:
(Twitter to block around 250 Tweets/Twitter accounts including Prasar Bharati CEO account)