पुढील आठवड्यात लाँच होणार रिअलमीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास?

| Updated on: Feb 18, 2021 | 1:44 PM

पुढील आठवड्यात लाँच होणार रिअलमीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास? (Two Realme smartphones will be launched next week)

पुढील आठवड्यात लाँच होणार रिअलमीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास?
पुढील आठवड्यात लाँच होणार Realme Narzo 30
Follow us on

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमी पुढील आठवड्यात भारतात दोन नविन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने नविन स्मार्टफोनचे टीझर जारी केले आहेत. तसेच या स्मार्टफोनच्या लाँचची तारीखही कंपनीने घोषित केली आहे. रिअलमी ने कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर नविन स्मार्टफोन Realme Narzo 30 च्या लाँचबाबत माहिती दिली आहे. (Two Realme smartphones will be launched next week)

ऑनलाईन लाँच होणार स्मार्टफोन

रिअलमीने अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कंपनी Realme Narzo 30 स्मार्टफोन एका ऑनलाईन इव्हेंटमध्ये 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता लॉन्च करणार आहे. कंपनी या इव्हेंटमध्ये Narzo 30 सीरीजचे दोन स्मार्टफोन लॉन्च करणार असून यात Realme Narzo 30A आणि Realme Narzo 30 Pro 5G या फोनचा समावेश आहे.

फ्लिपकार्टवर तयार केली मायक्रोसाईट

ई-कॉमर्स प्लेटफॉर्म फ्लिपकार्टवर Realme Narzo 30 सिरीजची एक मायक्रोसाईट क्रिएट करण्यात आली आहे. म्हणजेच या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासोबतच Realme ऑनलाइन स्टोर वर ही उपलब्ध करण्यात येणार आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध वेब पेजवर दोन स्मार्टफोन दिले आहेत, ज्यामध्ये बॅक ट्रिपल कॅमरा सेन्सरसह एका फोनमध्ये स्क्वायर शेप आणि दुसऱ्या फोनमध्ये रेक्टँगुलर शेप कॅमरा मॉड्युलमध्ये दाखवले आहे. पेजवर देण्यात आलेल्या माहितीनुसार एका स्मार्टफोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे.

Realme Narzo 30 सिरीजची वैशिष्टे

Realme Narzo 30 Pro स्मार्टफोन हा 5G फोन असेल, तसेच हा फोन MediaTek Dimensity 800U 5G प्रोसेसरसह सुसज्ज असेल, असा खुलासा फ्लिपकार्डवरील टीझर पेजवर करण्यात आला आहे. Realme Narzo 30 Pro फोन TENAA लिस्टिंगमध्येही स्पॉट करण्यात आला होता. या लिस्टिंगनुसार या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच स्क्रिन देण्यात आले आहे. तसेच 5000mAh पावर बॅटरी बॅकअप मिळेल आणि डिस्प्लेचे रिफ्रेश रेट 120Hz असेल. (Two Realme smartphones will be launched next week)

 

 

इतर बातम्या

आता मोबाईल बिल महागणार, दूरसंचार कंपन्या शुल्क वाढवण्याच्या तयारीत

स्टॅम्प पेपरच्या व्यवसायात बक्कळ पैसा कमावण्याची संधी, कमी पैशांमध्ये मिळेल जास्त नफा