नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : डीजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय पेमेंटला केंद्र सरकार पाठींबा देत आहे. त्यामुळे आता कॅशजवळ बाळगण्याऐवजी आता प्रत्येक जण युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करीत आहे. अगदी चहावाल्यापासून नारळपाणीवाल्यापर्यंत आता युपीआयने पेमेंट स्वीकारत आहेत. आता युपीआयने युपीआय लाईट ( UPI Lite ) फिचर्स सुरु केले आहे. यासेवेत युपीआय पेमेंट करणे आता आणखीन सोपे होणार आहे.
युपीआय लाईट सेवेद्वारे युपीआय पिन क्रमांकाशिवाय आपण पाचशे रुपयांपर्यंतचे ट्राझंक्शन करु शकणार आहे. आता पाचशे रुपयांच्या ऐवजी 2000 रुपयांपर्यत मर्यादा वाढविण्यात आली आहे. ही सुविधा आपल्या छोट्यात छोट्या पेमेंट सुरक्षित करणार आहे. युपीआय लाईटची सुविधा आता पेटीएम ( PayTm ) वर मिळत आहे. तुम्ही पेटीएम मोबाईल एपवर ही सुविधा सोप्या पद्धतीने एक्टीव करु शकणार आहे.
– आधी तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम एप उघडावे लागेल.
– यानंतर UPI Lite चा पर्याय निवडावा लागेल.
– आता UPI Lite वरून बँक खाते लिंक करावे लागेल
– यानंतर हवी असलेली रक्कम त्यात टाकावी लागेल
– आता तुमचा UPI पिन टाकावा लागेल.
– तुमचा UPI Lite आता सुरु झाला आहे.
– आता तुम्ही फक्त टॅब करून UPI पेमेंट करू शकणार
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनरनी डीजिटल पेमेंट देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचविण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याची घोषणा केली होती. युपीआय लाईट सर्व लोकांपर्यंत पोहचण्यासाठी युपीआय लाईटची मर्यादा आता 2000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाने देशातील ग्रामीण भागात युपीआय पोहचविण्यास मदत होणार आहे. तुम्ही एका दिवसात 4000 रुपयांपर्यंत यात समाविष्ट करु शकता. युपीआय लाईट फिचर पेटीएम सोबतच फोन पे ( Phone Pay ), गुगल पे ( Google ) सारख्या अनेक एपवर उपलब्ध आहे.