WhatsApp चा वापर आता स्मार्टवॉचवर पण करता येतो. युझर्सला Wear OS हा एक चागंला पर्याय समोर आला आहे. अनेक युझर्सला आतापर्यंत माहिती नव्हते की, ते त्यांच्या स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲप इन्स्टॉल करु शकतात. डाऊनलोड करु शकतात. विना फोन चॅटिंग करु शकतात. तुम्ही काही सोप्या पद्धतींचा वापर करुन, स्टेप्स फॉलो करुन तुमच्या स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲपचा वापर करु शकता.
डायलरचा होणार उपयोग
व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर विकसीत होत आहे. हे फीचर युझरला त्यांच्या व्हॉट्सॲप डायलरच्या माध्यमातून व्हाईस कॉलची सुविधा देणार आहे. हे नवीन फीचर अजून पर्यंत Google Play बीटा प्रोगामवर वापरकर्त्यांसाठी देण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हे फीचर त्या युझर्सला एकदम उपयोगी पडेल, ज्यांच्याकडे समोरील व्यक्तीचा क्रमांक सेव्ह नसेल. त्याला केवळ डायलरवरुन संबंधिताचा मोबाईल क्रमांक डायल करुन व्हॉट्सॲप कॉल करता येईल.
व्हॉट्सॲपवर लवकरच AI फीचर
जगभरात आत एआयचा बोलबाला सुरु आहे. व्हॉट्सअपवर त्याचा वापर होणार आहे. Meta लवकरच AI क्लबमध्ये सहभागी होईल. AI च्या Llama मॉडलचा वापर करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता टूलचा वापर युझर्स त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळवू शकतील. एआय फीचरमुळे युझर्सला स्वतंत्र एआय ॲपची गरज राहणार नाही. युझर्सला एका क्लिकवर AI Access मिळणार आहे. WABetaInfo नुसार लवकरच iOS आणि Android बीटावर हे फीचर दिसेल. Meta AI फीचर व्हॉट्सॲपमध्ये सर्वात टॉपवर दिसेल.
स्टेप 1 : तुमची स्मार्टवॉच फोनसोबत कनेक्ट करा
तुमच्या Android फोनवर Googl Play Store उघडा
Wear Os हे ॲप सर्च करा आणि ते इन्स्टॉल करा
आता हे ॲप उघडा. आता तुमच्या स्मार्टवॉचसोबत फोन कनेक्ट करण्यासाठी ऑन-स्क्रीन निर्देशांचे पालन करा. कााही कंपन्या वॉचसाठी डेडिकेटेड ॲप प्ले स्टोअरवर देतात.
स्टेप 2 : स्मार्टवॉचमध्ये व्हॉट्सॲप इन्स्टॉल करा
तुमच्या Wear OS स्मार्टवॉचवर Google Play Store उघडा
आता व्हॉट्सॲप सर्च करा आणि इन्स्टॉल करा. जर तुम्हाला हे ॲप दिसत नसेल तर मग स्मार्टवॉच त्यासाठी सक्षम नसल्याचे समोर येते.
स्टेप 3 : स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲप सेटअप करा
तुमच्या स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲप उघडा
तुम्हाला स्मार्टवॉच स्क्रीनवर एक 8 अंकांचा कोड दिसेल
तुमच्या Android फोनवर व्हॉट्सॲप उघडा
तुम्हाला आता एक नोटिफिकेशन दिसेल. त्यात तुम्हाला नवीन डिव्हाईस खात्याशी जोडायचे आहे का? असा संदेश दिसेल.