मुंबई : 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. या दिवशी प्रेमाची कबुली देणं इतर दिवसांपेक्षा सोपं असतं, अशी तरुणाईमध्ये समज आहे. यासाठी तरुण तरुणी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी खास गिफ्ट वगैरे घेतात. दुसरीकडे, सोशल मीडियाचा काळ असून आपलं प्रेम व्यक्त करणं आणखी सोपं माध्यम झालं आहे. व्हॉट्सअॅप हे संवादाचं सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. या माध्यमातून प्रिय व्यक्तींसी संवाद साधणं आणखी सोपं होतं. यासाठी व्हॉट्सअॅपनं एक खास स्टिकर लाँच केलं आहे. या स्टिकर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता. हे स्टिकर अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. इतकंच काय तर फ्रीमध्ये शेअर करू शकता.आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा विश करण्यासाठी व्हॉट्सअॅपचं हे फीचर नक्कीच कामी येईल. विशेष म्हणजे यात फक्त एकच स्टिकर नसून अजून बरंच काही आहे. या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.
याच पद्धतीने तुम्ही अॅपल अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरून थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप स्टिकर अॅप डाउनलोड करू शकता. यासाठी चॅट अॅपसाठी Sticker.ly, Sticker Maker + Stickers, Stickles आणि Wsticker यांचा समावेश आहे. हे अॅप्स दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोफत आहे. यात व्हॅलेंटाईन थीमची मोठी लिस्ट आहे.