मुंबई : एअरटेल आणि रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आयडियाने आता 5 नवीन आणि स्वस्त प्लॅन लॉंच (5 New and cheaper plans launched) केले आहेत. यामध्ये 3 प्लॅन 100 रुपयांपेक्षा कमी आहेत, तर 2 प्लॅन 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. जर तुम्ही स्वस्त प्लॅन्सच्या शोधात असाल तर या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी काही खास सुविधा (Some special features) असू शकते. तुम्ही इंटरनेटचा कमी वापर करत असलात तरी यापैकी एक योजना तुमच्यासाठी चांगली असू शकते. Vodafone Idea च्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये तीन वेगवेगळ्या योजना आहेत, जे सर्वांसाठी उपलब्ध झाले आहेत. या प्लॅनच्या किंमती 98 रुपये, 195 रुपये आणि 319 रुपये आहेत. हे तिन्ही प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Prepaid recharge plan) आहेत. Vi रिचार्ज प्लॅन 2022 अंतर्गत, यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि एसएमएस इत्यादी सुविधा मिळणार आहेत.
सर्वप्रथम, सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल बोलूया, तो आहे 29 रुपयांचा. ही एक अॅडऑन योजना आहे. यामध्ये यूजर्सना 2 दिवसांसाठी 2 GB डेटा दिला जात आहे. हा एक डेटा पॅक आहे, ज्यामुळे तुम्हाला या प्लॅनसह इतर कोणताही लाभ मिळणार नाही. कारण या प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएस किंवा इतर कोणताही फायदा दिला जात नाही.
हा देखील डेटा व्हाउचर प्लॅन आहे. म्हणजे यामध्ये यूजर्सना फक्त इंटरनेट मिळेल. ही योजना सर्वप्रथम गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ३ जीबी डेटा देण्यात आला आहे. त्याची वैधता 7 दिवस आहे.
98 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 200 MAB डेटा, अमर्यादित कॉल आणि 15 दिवसांची वैधता मिळेल. तथापि, या पॅकमध्ये एसएमएसचा समावेश नाही. डेटा संपल्यानंतर, प्रति एमबी 50 पैसे खर्च करावे लागतील.
प्रीपेड प्लॅन Vodafone Idea त्याच्या 195 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत व्हॉईस कॉल ऑफर करते. या प्लॅनमध्ये जीबी हायस्पीड डेटा आणि 300 मोफत एसएमएस देखील मिळतील, या पॅकची वैधता 31 दिवसांपर्यंत आहे. यामध्ये मोफत व्ही मूव्ही आणि टीव्ही सबस्क्रिप्शन सेवा उपलब्ध आहे. इंटरनेट डेटा संपल्यानंतर एका एमबीवर 50 पैसे आकारले जातील.
Vodafone Idea च्या Rs 319 च्या प्लॅन मध्ये यूजर्सला अमर्यादित व्हॉईस कॉल्स मिळतील. यामध्ये युजर्संना दररोज 2 GB इंटरनेट डेटा मिळेल तसेच 100 SMS, Binge All Night, Weekend Data Rollover ची सुविधा देखील मिळेल. याशिवाय कंपनीने या प्लॅनमध्ये Binge All Night, Data Rollover आणि Data Delights समाविष्ट केले आहे.