मुंबई : Vi कंपनीने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर जारी केली आहे. प्रिपेड युजर्ससाठी ही खास ऑफर आहे. नव्या ऑफरनुसार 249 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना आता रात्री अनलिमेटेड हायस्पीड डेटा मिळणार आहे. रात्री 12 ते सकाळी 6 या कालावधीत ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येईल. (Vi Unlimited High Speed Night Data offer for prepaid users)
व्होडाफोन आयडीया या टेलीकॉम कंपनीने जाहीर केल्यानुसार या योजनेचा फायदा प्रिपेड ग्राहकांना घेता येईल. ज्या ग्रहकांनी 249 रुपयांचे किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज केलेले असेल, त्यांना रात्री 12 ते 6 या कालावधित अनलिमिटेड डाटा वापरता येईल. तसेच, नव्या प्लॅननुसार आता ग्राहकांना विकेन्ड डाटा रेलओव्हरचाही फायदा मिळेल. सोमवार ते शुक्रवार या कालावधित शिल्लक राहिलेला डाटा ग्राहकांना शनिवार आणि रविवारी वापरता येईल. या नव्या ऑफरमुळे ग्राहकांना मनोरंजनाचा आनंद लुटता येईल. तसेच, ओटीटी प्लॅटफॉर्मचाही जास्त काळ आनंद घेता येईल, असा दावा वोडाफोन आयडिया या कंपनीने केला आहे.
दरम्यान, Ookla या ब्रॉडबॅन्ड स्पीड टेस्ट करणाऱ्या संस्थेने व्होडाफोन आयडीया या टेलकॉम कंपनीच्या इंटरनेटची स्पीड सर्वात जास्त असल्याचे सांगितले आहे. मागील तिमाहीत ही स्पीड अनुक्रमे 13.74Mbps आणि 6.19Mbps असल्याचे Ookla संस्थेने म्हटले आहे. त्यांनतर एअरटेल या कंपनीचा क्रमांक येतो.
Video : Raigad | श्रीकांत शिंदेंकडून प्रत्यक्ष भेटून रायगड किल्ल्याची पाहणी #Raigad @DrSEShinde @mieknathshinde pic.twitter.com/ij6SGY7oKc
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
इतर बातम्या :
(Vi Unlimited High Speed Night Data offer for prepaid users)