मुंबई | 13 मार्च 2024 : टेक्नॉलॉजीत नवनवीन संशोधन करणाऱ्या चीनने आता इतर महासत्तांना मागे टाकले आहे. आपला शेजारी असलेल्या चीनने आता एक अनोखा युरिनल तयार केला आहे. चीनच्या इंजिनिअर्सनी एक अशा युरिनल तयार केले आहे. जे आजाराचे निदान करु शकणार आहे. या युरिनलमध्ये लघु शंका करताच त्याव्यक्तीला आजाराचे निदान झटपट मिळणार आहे. हे युरिनल अतिशय अत्याधुनिक आहे. त्यामुळे शरीरातील सर्व आजारांचा मिनिटांत पत्ता लावणे सोपे होणार आहे. या अत्याधुनिक युरिनलचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
येथे पाहा पोस्ट –
In China, new toilet tests let you check your health just by peeing… pic.twitter.com/JywPqegUui
— Tansu Yegen (@TansuYegen) March 11, 2024
चीनने तयार केलेल्या आधुनिक युरिनलचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता की हा युरिनल पब्लिक टॉयलेटमध्ये लावला आहे. या युरिनल सीटच्या वर एक स्क्रिन लावण्यात आला आहे. या युरिनलचा वापर जो कोणी करेल त्याच्या लघवीचा रिपोर्ट क्षणात स्क्रीनवर देणार आहे. त्यातून या व्यक्तीच्या आरोग्याचे निदान तातडीने होणार आहे. त्याव्यक्तीला कोणता आजार आहे याची माहीती लागलीच कळणार आहे. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती देखील स्वत: या आधुनिक युरिनल पॉटची माहीती देताना या व्हिडीओत दिसत आहे.
चीनच्या या अत्याधुनिक युरिनलचा व्हिडीओ सोशल साईट एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म देखील हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. एक्स ( आधीचे ट्वीटर ) सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहीले आहे. एक्स वर @TansuYegen नावाच्या हॅंडलने हा व्हिडीओ शेअर केला आहे.