Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…
Vivoनं अखेर आपला कलर चेंजिंग इफेक्ट (Color Changing Effect) असलेला स्मार्टफोन भारतात लॉन्च केलाय. Vivo V23 असं या फोनचं नाव असून सीरीज फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर दिलाय.
1 / 5
Vivoनं अखेर आपला कलर चेंजिंग इफेक्ट (Color Changing Effect) असलेला स्मार्टफोन भारतात लॉन्च केलाय. Vivo V23 असं या फोनचं नाव असून सीरीज फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर दिलाय. सर्व हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सेलचा ड्युअल सेल्फी कॅमेरादेखील उपलब्ध आहे. Vivo V23 आणि Vivo V23 Pro आज भारतात लॉन्च झाले आहेत. या फोनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं बॅक डिझाइन. व्हिवोनं दावा केलाय, की मागच्या पॅनलवर रंग बदलणारा प्रभाव असणारा हा पहिला स्मार्टफोन आहे.
2 / 5
Vivo V23 5Gच्या बेस 8GB+128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,990 रुपये आहे. तर 12GB+256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 34,990 रुपये आहे. Vivo V23 Pro 5Gच्या 8GB+128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 38,990 रुपये आहे. 12GB+256GB स्टोरेज असलेल्या हाय-एंड मॉडेलची किंमत 43,990 रुपये आहे. Vivo V23 5G स्टारडस्ट ब्लॅक कलरमध्ये येतो आणि Vivo V23 Pro 5G सनशाइन गोल्ड कलरमध्ये येतो.
3 / 5
Vivo V23 फोन हा रंग बदलणाऱ्या फ्लोराइट एजी ग्लाससह येणारा पहिला स्मार्टफोन आहे. सूर्यप्रकाश किंवा कृत्रिम अतिनील किरणांच्या संपर्कात आल्यावर तो रंग बदलतो. हे वैशिष्ट्य केवळ V23 आणि V23 Proच्या Sunshine Gold कलर मॉडेलवर येतं. स्मार्टफोनला भारतात MediaTek Dimensity 920 प्रोसेसर वापरला आहे, तर Vivo V23 Pro 5G फोनला MediaTek डायमेंशन 1200 प्रोसेसर आहे.
4 / 5
बेस व्हेरियंटमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे तर प्रो व्हेरिएंटमध्ये 108-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. व्हॅनिला Vivo V23 5G फ्लॅट मेटल फ्रेमसह येतो.
5 / 5
Vivo V23 Pro स्मार्टफोन 6.56″ FHD+AMOLED डिस्प्लेसह लॉन्च करण्यात आलाय. डिव्हाइसवर फ्लोराइट एजी ग्लास वापरण्यात आलाय. पॉवरसाठी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यासाठी फोनमध्ये 4300mAh बॅटरी आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ब्लूटूथ 5.2 आहे.