मुंबई : विवोच्या नव्या फोनबाबत मोबाईलप्रेमींमध्ये बऱ्याच दिवसांपासून असलेली उत्सुकता अखेर संपली आहे. कंपनीने विवो V27 आणि V27 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनकडे पाहिलं तर आपल्या V25 सीरिजची आठवण आल्याशिवाय राहात नाही. कंपनीने V25 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये काही बदल केले आहेत. बॅक पॅनलमध्ये रंग बदल होणारं फीचर्स या स्मार्टफोन V25 सीरिजपेक्षा वेगळं करतं. त्याचबरोबर V27 आणि V27 प्रो या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कर्व्ह्ड डिस्प्ले असणार आहे. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये पंच होल कॅमेरा कटआउट असून फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.
विवो V27स्मार्टफोनच्या 8 जीबी + 128 जीबी व्हेरियंटची किंमत 32,999 रुपये, 12 जीबी + 256 जीबी व्हेरियंटची किंमत 36,999 रुपये इतकी आहे. या फोनची विक्री 23 मार्चपासून सुरु होणार आहे. दुसरीकडे विवो V27 प्रो मॉडेलच्या 8जीबी + 128 जीबी व्हेरियंटची किंमत 39,999 रुपये आणि 8 जीबी + 256 जीबी व्हेरियंटची किंमत 42,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनची फ्लिपकार्टवर प्री बुकिंग सुरु झाली आहे.
A stunning phone that will put you in the spotlight!#TheSpotlightPhone is here in 2 exciting colours exclusively for you. Are you to ready to own the all-new #vivoV27Series?
Pre-book the all-new vivo V27 series today: https://t.co/apQ3mpSnZe#DelightEveryMoment pic.twitter.com/lcLsRw2iSJ
— vivo India (@Vivo_India) March 1, 2023
V27सीरिज अँड्रॉईड 13 वर अधारित फनटच ओएस 13 वर काम करतो. यात 120 एचझेड रिफ्रेश रेट्ससह 3डी कर्व्ह्ड स्क्रिन दिली आहे. विवोच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. V27 प्रो स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 वर चालतो. तर V27 हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 5जी वर आधारित आहे.
विवो V27 आणि विवो V27 प्रो 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे.
कनेक्टिविटीसाठी दोन फोनमध्ये वायफाय, 5जी, ब्लूटूथ व्ही5.3, जीपीएस आणि युएसबी टाइप सी पोर्ट दिलं आहे. दोन्ही फोनमध्ये 4600 एमएएच बॅटरी दिली असून 66 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.